आवृत्ती पुणे
← Back to Homepage

वाहनचालकांवर खडक पोलिस ठाण्याची धडक कारवाई : 39 हजारांचा दंड वसूल

maharashtra jain warta • News Slider, Police, Previous Issue • July 5, 2023

महाराष्ट्र न्युज नेटवर्क

पुणे : खडक पोलिस स्टेशन हद्दीत बेशिस्त वाहनचालकांवर कारवाईची मोहिम राबवण्यात आली. बेशिस्त वाहनचालकांविरूद्ध कारवाई करत साडे एकोणचाळीस हजार रूपयांचा दंड वसूल केला.

या कारवाईत विना परवाना वाहनधारक, विमा नसलेली वाहने, ट्रिपल सीट वाहने, मोबाईल फोनवर बोलणारे लोक, सिग्नल मोडणारे वाहन चालक, अल्पवयीन मुले यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात आली. या कारवाई दरम्यान साडे एकोणचाळीस हजाराचा दंड आकारण्यात आला. तसेच अल्पवयीन मुलांच्या पालकांवर कारवाई करण्यात आली.
तसेच यापुढे अल्पवयीन मुलांना वाहने चालवण्यास न देण्याबाबत सूचनाही करण्यात आली. तसेच विनाहेल्मेट गाडी चालवणाऱ्यांना हेल्मेट वापराबाबतच्या सूचना देण्यात आल्या. मोटर वाहन कायद्याची योग्य अंमलबजावणी होण्याबाबत वाहतूक पोलिस दक्ष असून, रस्त्यावरील अपघात कमी होण्याकरिता वाहतुकीच्या चिन्हांचा वापर कऱण्याविषयी मार्गदर्शन कऱण्यात आले.
तसेच वाहन कायदा नियमांचा भंग केल्यास त्याबाबत कठोर कारवाई कऱण्यात येणार असल्याचेही नागरिकांना सुचित करण्यात आले. वरील कारवाई परिमंडळ 1चे पोलिस उपायुक्त संदीपसिंह गिल्ल यांच्या मार्गदर्शनाखाली फरासखाना विभागाचे सहायक पोलिस आयुक्त अशोक धुमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली खडक पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुनील माने, पोलिस निरीक्षक संपतराव राऊत, पोलिस निरीक्षक विनय पाटणकर आणि खडक पोलिस ठाण्याचे अधिकारी व वाहातूक विभागाचे अंमलदार यांनी ही कारवाई केली.

get_footer();