आवृत्ती पुणे
← Back to Homepage

‘डीएसकें’च्या बंगल्यातून चोरी करणारा जेरबंद

maharashtra jain warta • News Slider, Police, Previous Issue • October 18, 2021

गुन्हे शाखा युनिट-२ची कामगिरी : सराईत चतुःश्रृंगी पोलीस स्टेशनच्या ताब्यात

महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क

पुणे : डी. एस. के. यांच्या ई. डी. ने जप्त केलेल्या बंगल्यातून घरफोडी करणाऱ्या पोलीस अभिलेखावरील सराईत गुन्हेगारास जेरबंद करण्यात गुन्हे शाखा युनिट-२ला यश मिळाले असून,त्यास पुढील कार्यवाहीसाठी चतुःश्रृंगी पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले आहे.

पुणे शहरात घरफोडीच्या गुन्ह्यामध्ये वारंवार वाढ होत असल्याने, वरिष्ठांनी रेकॉर्डवरील गुन्हेगारांवर पाळत ठेवण्याचे आदेश दिले होते. त्या अनुषंगाने गुरुवारी १४ ऑक्टोबर रोजी सहायक पोलीस निरीक्षक प्रकाश मोरे आणि त्यांचा इतर स्टाफ असे बंडगार्डन पोलीस स्टेशन हद्दीत गुन्हे प्रतिबंधक गस्त घालत असताना संगम ब्रिज या ठिकाणी आले असता, पोलीस नाईक चेतन गोरे यांना त्यांच्या बातमीदारामार्फत कळाले की, पुणे शहरातील बहुचर्चित असा दीपक सखाराम कुलकर्णी ऊर्फ डी. एस. के. यांच्या ई. डी. ने जप्त केलेल्या बंगल्यातून घरफोडी करणारा पोलीस अभिलेखावरील सराईत गुन्हेगार सुरेश शंकर धोत्रे (वय ४३, रा. दीप बंगला चौक वडारवाडी पुणे) हा जय बजरंगबली मंदिर, दीप गोलंदाज चौक येथे थांबलेला असून त्याच्याकडे एका पांढऱ्या रंगाच्या पोत्यात छिलून काढलेल्या तांब्याच्या तारा गुंडाळलेल्या आहेत. सदरचा माल तो विक्रीकरिता घेऊन जाणार आहे. अशी खात्रीशीर बातमी मिळाल्याने सदरची बातमी युनिट २ प्रभारी पोलीस निरीक्षक क्रांतिकुमार पाटील यांना कळविली असता त्यांनी खात्री करून कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश दिले.

पोलीस निरीक्षक प्रकाश मोरे वरील स्टाफसह सदर ठिकाणी जाऊन गुप्तपणे पाहणी करीत असताना सदर इसम दिसून आला. त्यास ताब्यात घेऊन त्याच्या ताब्यातील पोत्याची पंचासमक्ष पाहणी केली असता पोत्यामध्ये २३,००० रुपये किमतीच्या ३० किलो वजनाच्या केबल छिलून काढलेल्या तांब्याच्या (कॉपर) तारा मिळून आल्या. तसेच त्याने विकलेल्या २७,००० रुपये किमतीच्या ३५ किलो वजनाच्या केबल छिलून काढलेल्या तांब्याच्या (कॉपर) तारा भंगार खरेदी विक्री करणारा दुकानदार झाकिर ताजऊद्दीन गोलंदाज (रा. जुनी वडारवाडी पुणे) याच्या दुकानातून जप्त करण्यात आल्या. असा सर्व मिळून ५०,००० रुपये किमतीच्या ६३ किलो वजनाच्या तांब्याच्या तारा मिळून आल्या. याबाबत त्यास विश्वासात घेऊन तपास करता, त्याने आणि त्याच्या इतर साथीदारांसह त्या डी. एस. के. बंगल्यातून चोरल्या असल्याचे सांगितले. सदर चोरीबाबत चतुःश्रुंगी पोलीस स्टेशनकडील रेकॉर्डची पाहणी केली असता चतुःश्रृंगी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल असल्याचे समजल्याने त्यास दाखल गुन्ह्यात अटक करून चतुःश्रृंगी पोलीस स्टेशनकडे वर्ग करण्यात आले आहे.

आरोपी सुरेश शंकर धोत्रे हा पोलीस अभिलेखावरील गुन्हेगार असून त्याच्यावर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी कायदा (मोक्का), जबरी चोरी, अमली पदार्थ जवळ बाळगणे, शरीरा विरुद्धचे गंभीर गुन्हे या सारखे गंभीर स्वरूपाचे गुन्हे विविध पोलीस स्टेशनला दाखल आहेत.

सदरची कामगिरी ही, पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, पोलीस सहआयुक्त डॉ. रवींद्र शिसवे, मा. अप्पर पोलीस आयुक्त (गुन्हे) रामनाथ पोकळे, पोलीस उपआयुक्त (गुन्हे) श्रीनिवास घाडगे, सहायक पोलीस आयुक्त (गुन्हे) लक्ष्मण बोराटे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक क्रांतिकुमार पाटील, पोलीस निरीक्षक प्रकाश मोरे, सहायक पोलीस फौजदार यशवंत आंब्रे, पोलीस हवालदार किशोर वग्गु, साधना ताम्हाणे, पोलीस नाईक चेतन गोरे, चंद्रकांत महाजन, पोलीस शिपाई करण ढंगारे यांनी केली आहे.

get_footer();