आवृत्ती पुणे
← Back to Homepage

दुचाकीवरील चोरट्याने कुरिअरचे तीन लाखाचे पार्सल लांबविले

maharashtra jain warta • News Slider, Police, Previous Issue • August 23, 2021

महाराष्ट्र ३६० न्यूज

पुणे: कुरिअर डिलिव्हरी बॉयने मोटारसायकलवर ठेवलेले कुरिअरचे पार्सलची बॅग मोपेडवर आलेल्या दोन चोरट्यांनी पळवून नेली. त्या बॅगमध्ये सुमारे दोन लाख ८३ हजार ४८० रुपयांच्या ऐवज होता. ही घटना धायरीतील डिएसके विश्व, पवन-बी बिल्डिंगसमोरील रस्त्यावर गुरुवारी (दि. १९ ऑगस्ट) रोजी घडली.

याप्रकरणी कुरिअर डिलिव्हरी बॉयने सिंहगड रोड पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली आहे. त्यानुसार गुन्हादाखल केला असून, सिंहगड रोड पोलीस स्टेशनमधील पोलीस नाईक सचिन गायकवाड पुढील तपास करीत आहेत.

get_footer();