आवृत्ती पुणे
← Back to Homepage

दुखापत करून जबरी चोरी करणारे जेरबंद

maharashtra jain warta • News Slider, Police, Previous Issue • October 31, 2021

बार्शी तालुका पोलिसांची कामगिरी : एकूण पासष्ट हजारांचा मुद्देमाल हस्तगत

महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क

बार्शी : दुखापत करून जबरी चोरी करणाऱ्यास जेरबंद करण्यात बार्शी तालुका पोलिसांना यश मिळाले असून, या प्रकरणी दोन गुन्हे उघडकीस येऊन एकूण पासष्ट हजारांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

बार्शी तालुका पोलीस ठाणे हद्दीत दि. 30 जुलै रोजी रात्री साडेआठच्या सुमारास फिर्यादी, त्यांची पत्नी व मुलगी असे मोटार सायकलवरून जात असताना ताडसौंदणे गावाचे पुढे काही अंतरावर चार अनोळखी आरोपींनी त्यांना मारहाण करून चाकूचा धाक दाखवून त्यांच्याजवळील सोन्याचे दागिने व रोख रक्कम जबरदस्तीने घेऊन गेले होते. याबाबत बार्शी तालुका पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता. या वाढत्या चोरीच्या घटनांमुळे सोलापूर ग्रामीण पोलीस अधीक्षकांनी सदर गुन्हे उघडकीस आणण्याबाबत सूचना केल्या होत्या. त्या अनुषंगाने प्रभारी अधिकारी सहायक पोलीस निरीक्षक जायपत्रे यांनी सबइन्स्पॅक्टर जाधव, हेडकॉन्स्टेबल सुभाष सुरवसे, राजेंद्र मंगरुळे, पोलीस नाईक अभय उंदरे, अमोल माने यांचे विशेष पथक नेमण्यात आले.

प्रभारी अधिकारी जायपत्रे यांना मिळालेल्या गोपनीय बातमीद्वारे यांनी आरोपी निष्पण्ण करून आरोपी प्रशांत ऊर्फ सचिन बापू काळे ऊर्फ पवार (वय 23, रा. तेरखेडा ता. वाशी जि. उस्मानाबाद) यांच्यावर वॉच ठेवून सदर आरोपी हा तेरखेडा गावातील चौकात येणार आहे, अशी गोपनीय माहिती मिळाली होती. आरोपी प्रशांत ऊर्फ सचिन बापू काळे ऊर्फ पवार यास दि. 26 ऑक्टोबर रोजी ताब्यात घेऊन बार्शी पोलीस ठाणे येथे आणून त्यास विश्वासात घेऊन तपास केला असता, त्याने इतर तीन साथीदाराच्या मदतीने केलेले दोन गुन्हे उघडकीस आणले.
सदर दोन गुन्ह्यातील बार्शी हद्दीतील पहिल्या गुन्ह्यात सोन्याचे मणी मंगळसूत्र व दोन कर्णफुले असा एकूण 40,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. भुम पोलीस ठाण्यातील दुसऱ्या गुन्ह्यात वापरलेली 15000 रुपयांची मोटार सायकल जप्त करण्यात आलेली आहे.

सदरची कामगिरी ही पोलीस अधिक्षक तेजस्वीनी सातपुते, अपर पोलीस अधिक्षक हिंमत जाधव, करमाळा उपविभागीय पोलीस अधिकारी हिरे यांच्या मार्गर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक शिवाजी जायपत्रे, इन्स्पॅक्टर प्रवीण जाधव, हेड कॉन्स्टेबल सुभाष सुरवसे, राजेंद्र मंगरुळे, पोलीस नाईक अमोल माने, अभय उंदरे, धनराज केकाण, कॉन्स्टेबल वैभव भांगे, रतन जाधव सायबर सेल यांनी केली आहे.

get_footer();