आवृत्ती पुणे
← Back to Homepage

फेक अकाउंटद्वारे फसवणूक करणाऱ्यांच्या मुसक्या आवळल्या

maharashtra jain warta • News Slider, Police, Previous Issue • December 20, 2021

सोलापूर ग्रामीणच्या सायबर शाखेची कामगिरी : राजस्थान आणि उत्तर प्रदेशमधून केली अटक

महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क

सोलापूर : बनावट फेसबुक अकाउंट तयार करून पैशाची मागणी करणाऱ्या दोघांना राजस्थान व उत्तर प्रदेशमधून सोलापूर ग्रामीणच्या पोलिसांनी जेरबंद केले. सोलापूर ग्रामीणच्या सायबर पोलीस शाखेच्या पथकाने दमदार कामगिरी केली.

मोनुकुमार नथुसिंग पाल (वय २६, रा. पांचलीबुजुर्ग, मेरठ, उत्तर प्रदेश) आणि देवकरण हनुमानसिंग रावत (वय २४, रा. फारकिया, ता. नसिराबाद, जि. अजमेर, राजस्थान) अशी अटक केलेल्या दोघांची नावे आहेत.

फेसबुकवरील प्रोफाईलची कॉपी करून फेक प्रोफाइल बनवून सदरची व्यक्ती तीच आहे, असे भासवत वेगवेगळ्या अडचणींसाठी तात्काळ पैशाची गरज आहे. फोन पेद्वारे किंवा गुगलद्रवारे पैशाची मागणी करण्याच्या प्रकारात वाढ झाली आहे. यामध्ये सामान्यतः समाजातील प्रतिष्ठित, प्रशासकीय अधिकारी यांना लक्ष्य करून पैशाची मागणी करीत असल्याच्या घटना घडल्या.

त्यामध्ये जानेवारी २०२१ मध्ये सोलापूर जिल्ह्यातील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी यांचे फेसबुक फेक अकाउंट तयार करून मित्र, नातेवाईक व ओळखीच्या लोकांना फ्रेंड रिक्वेस्ट पाठवून तात्काळ सुमारे १० हजार व सात हजार रक्कम मोबाईल नंबरवर मागवून फसवणूक केल्याची तक्रार माढा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर ऑक्टोबरमध्ये सोलापूर ग्रामीणचे अधीक्षकांच्या नावेही फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल झाला. सोलापूर ग्रामीणचे सायबर पोलीस स्टेशनचे प्रभारी पोलीस निरीक्षक श्रीकांत पांडुळे यांनी तांत्रिक विश्लेषणद्वारे माहिती निष्पन्न करून स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सर्जेराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली दोन पथके तयार केली. त्यानुसार दोन पथकातील अधिकारी-अंमलदार यांनी दोन्ही गुन्ह्यातील आरोपींचे मोबईल जप्त करून आरोपींना जेरबंद केले. न्यायालयाने आरोपींना न्यायालयीन कोठडी सुनावली.

सोलापूर ग्रामीणच्या पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते, अपर पोलीस अधीक्षक हिंमत जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सायबर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्रीकांत पांडुळे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सर्जेराव पाटील यांच्या नेतृत्वाखाली सहायक पोलीस निरीक्षक शशिकांत शेळके, गणेश पिंगुवाले, शैलेश खेडेकर, सूरज निंबाळकर, मनोज भंडारी, मोहन मनसावले, दत्ता खरात, विशाल टिंगरे, सचिन मसलखांब, सचिन दरदरे, अन्वर अत्तार, अर्जुन केवळे यांच्या पथकाने ही कामगिरी केली.

get_footer();