आवृत्ती पुणे
← Back to Homepage

महिलेचा चाकूने सपासप वार करणारा जेरबंद

maharashtra jain warta • News Slider, Police, Previous Issue • September 14, 2021

भारती विद्यापीठ पोलिसांची कारवाई : पुण्याच्या कात्रज घाटात प्रेमसंबंधातून घडले प्रकरण

महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क

पुण्यात प्रेम संबंधातून एका 32 वर्षीय महिलेचा चाकुने सपासप वार करून खून झाल्याने प्रचंड खळबळ उडाली आहे. दरम्यान, भारती विद्यापीठ पोलिसांनी चाकुने वार करून खून करणार्‍याला अटक केल्याची माहिती समोर येत आहे. ही घटना रविवारी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास कात्रजच्या नवीन घाटाच्या सुरूवातीला असलेल्या कोळेवाडी येथे घडली.

सपना दिलीप पाटील (32) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी भारतीय विद्यापीठ पोलिसांनी राम गिरी नावाच्या तरूणाला अटक केली आहे.

पोलिसांनी सांगितले की, प्रेम संबंधातून धारदार चाकुने वार करून सपना पाटील यांचा खून करण्यात आला आहे. घटनेची माहिती मिळाल्यानंतर भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यातील वरिष्ठ अधिकार्‍यांनी तसेच इतर वरिष्ठ अधिकार्‍यांनी घटनास्थळी भेट दिली. गुन्हे शाखेच्या पोलिसांनी देखील घटनास्थळी भेट दिली आहे. राम गिरीने प्रेम संबंधातून सपना पाटील यांचा खून केल्याची माहिती समोर येत आहे.

सध्यातरी पोलिसांनी राम गिरीला अटक केली आहे. सपना पाटील आणि राम गिरी यांच्यात नेमकं काय झालं त्यामुळे राम गिरीने हे पाऊल उचलले याबाबत पोलिस माहिती घेत आहेत. दरम्यान, 32 वर्षीय महिलेचा कात्रज घाटाच्या सुरूवातीला असलेल्या कोळेवाडी येथे खून झाल्याने प्रचंड खळबळ उडाली आहे. गुन्हयाचा अधिक तपास भारती विद्यापीठ पोलिस करत आहेत.

याप्रकरणी खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वरिष्ठ पोलिस अधिकार्‍यांनी देखील घटनास्थळी भेट देऊन माहिती घेतली आहे.

get_footer();