आवृत्ती पुणे
← Back to Homepage

महिला पोलिसाची बनावट सोशल मिडिया अकाऊंटद्वारे बदनामी

maharashtra jain warta • News Slider, Police, Previous Issue • November 27, 2021

बिबवेवाडी पोलिसांत फिर्याद दाखल : अश्लील व्हीडिओ अपलोड केल्याचा प्रकार उघड

महाराष्ट्र ३६० न्यूज नेवटर्क

पुणे : महिला पोलीस कर्मचार्‍याच्या नावाने फेसबुक, इन्स्टाग्राम या सोशल मिडियावर बनावट अकाऊंट तयार करुन त्याद्वारे अश्लिल व्हिडिओ अपलोड केले. त्यावरुन या महिला पोलीस कर्मचार्‍यांच्या नातेवाईकांना अश्लिल मजकुराचे संदेश पाठवून बदनामी केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

याप्रकरणी एका २६ वर्षाच्या महिला पोलीस कर्मचार्‍यांनी बिबवेवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी यांच्या नावाने फेसबुक या सोशल नेटवर्किंग साईटवर त्यांचा फोटो वापरुन दोन बनावट अकाऊंट सुरु करण्यात आले. तसेच इन्स्टाग्रामवर दोन अकाऊंट सुरु करण्यात आले. त्यावर ‘पोलीस मी माझ्या नवर्‍याला सोडून दिले आहे. अ‍ॅटीट्युट गर्ल, माय लाईफ, माय चॉईस, माय मिस्टेक, बिलिव्ह इन माय सेल्फ
असे लिहून तसेच प्रोफाईलमध्ये अश्लिल व्हिडिओ अपलोड केले.

फिर्यादीच्या नातेवाईकांना अश्लिल मजकुराचे संदेश फिर्यादी यांनी पाठविले असल्याचे भासवून फिर्यादीची बदनामी केली. हा प्रकार लक्षात आल्यावर त्यांनी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली असून, पोलीस निरीक्षक अनिता हिवरकर अधिक तपास करीत आहेत.

get_footer();