आवृत्ती पुणे
← Back to Homepage

फायरिंगची धमकी देणाऱ्यासह तिघांवर गुन्हा

maharashtra jain warta • News Slider, Police, Previous Issue • December 28, 2021

फरासखाना पोलिसांत फिर्याद : कसबा पेठेतील मटण मार्केट येथे घडली घटना

महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क

पुणे : मद्यपिला घरी जाण्यास सांगताच तुम्ही इथून निघून जा नाही तर फायरिंग करीन अशी धमकी दिली. त्यानंतर त्याच्या घरातील लोकांनी गोंधळ घातल्याने महिलेसह तिघांवर फरासखाना पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल कऱण्यात आला आहे. कसबा पेठेतील मटण मार्केट येथे सोमवारी (दि. २७ डिसेंबर २०२१) मध्यरात्री बाराच्या सुमारास ही घटना घडली.

पोलीस अंमलदार रवींद्र दहातोंडे यांनी फरासखाना पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली असून, त्यानुसार एका महिलेसह तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी सांगितले की, कसबा पेठ व साततोटी पोलीस चौकी दरम्यान पोलीस मार्शल गस्तीवर होते. त्यावेळी कसबा पेठेतील मटण मार्केट येथे काही व्यक्ती दारू पिऊन गोंधळ करीत असल्याची फरासखाना पोलीस स्टेशनवरून माहिती मिळाली. त्यानुसार फिर्यादीने घटनास्थळी धाव घेत दारू पित बसलेल्या व्यक्तीस येथे बसू नका, निघून जा असे सांगितले. त्याने चिडून जाऊन मार्केट माझे आहे, मी कुठेही बसेन तुम्हीच येथून निघून जा नाही त र मी तुमच्यावर फायरिंग करीन अशी धमकी दिली. त्यानंतर कारवाई करण्यासाठी साततोटी पोलीस चौकीकडे घेऊन जात असताना आरोपीच्या घरातील लोकांनी हुज्जत घालून, अंगावर येत घरासमोरील लाईट बंद करून फिर्यादीस अटकाव निर्माण केला. फरासखाना पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक पाटील पुढील तपास करीत आहेत.

get_footer();