आवृत्ती पुणे
← Back to Homepage

सराईत वाहन चोर आणि अल्पवयीन साथीदाराकडून पाच गुन्हे उघड

maharashtra jain warta • News Slider, Political, Previous Issue, Social • April 20, 2023

महाराष्ट्र 360 न्यूज नेटवर्क

पुणे : मुंढवा पोलिस ठाण्याअंतर्गत पोलिसांनी परिसरात वाहनचोरी करणाऱ्या आरोपीला त्याच्या अल्पवयीन साथीदारासह अटक केली.

आरोपीकडून तीन वाहने, चोरीचे दोन मोबाईल जप्त केले. मुंढवा पोलिस हद्दीतील वाढत्या वाहन चोरीच्या अनुषंगाने पेट्रोलिंग करताना आरोपी सुरज सोनोने, वय वर्ष 20 (रा. केशवनगर, मुंढवा) आणि त्याचा अल्पवयीन साथीदार यांच्यावर संशय आल्याने त्याला अटक केली.
आरोपीला ताब्यात घेऊन तपास केला असता त्याच्याकडील मोटरसायकल जप्त केल्यावर अधिक चौकशी अंती इतर चोरींचा मुद्देमालही जप्त करण्यात आला. दोन मोटरसायकल, एक मोबाईल जप्त करून त्याने केलेल्या 5 गुन्ह्यांची उकल करण्यात आली. आरोपीवर मुंढवा पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदरची कामगिरी पुणे शहर पोलिस आयुक्त रीतेशकुमार, सह पोलिस आयुक्त संदीप कर्णिक, पूर्व प्रादेशिक विभागाचे अपर पोलिस आयुक्त रंजनकुमार शर्मा, परिमंडळ 5 पोलिस उपायुक्त विक्रांत देशमुख, हडपसर विभाग सहायक पोलिस आयुक्त बजरंग देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली मुंढवा पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अजित लकडे, गुन्हे पोलिस निरीक्षक प्रदीप काकडे, मुंढवा तपास पथकाचे अधिकारी सहायक पोलिस निरीक्षक संदिप जोरे तसेच तपास पथकातील अंमलदार यांनी ही कारवाई केली.

get_footer();