आवृत्ती पुणे
← Back to Homepage

पादचारी कामगारांना लुटणारे तिघे जेरबंद

maharashtra jain warta • News Slider, Police, Previous Issue • November 16, 2021

कोंढवा पोलिसांची कामगिरी : एक हजार ७०० रुपये, आणि एटीएम कार्डसह कागदपत्रे नेली होती चोरून

महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क

पुणे : पिसोळीतील धर्मावत पेट्रोल पंपाच्या पाठीमागील रस्त्याने कामावरून घरी जाताना कामगाराला लुटणाऱ्या तिघांना कोंढवा पोलिसांनी जेरबंद केले. शनिवारी (दि. १३ नोव्हेंबर) रात्री साडेआठच्या सुमारास रस्त्यात अडवून एक हजार ७०० रुपये, एटीएमसह महत्त्वाची कागदपत्रे जबरदस्तीने चोरून नेली होती.

सोहेल फारुख शेख (वय २३), गोविंद विनायक हाके (वय २१), राहील माजिद शेख (वय २१, तिघे रा. शिवनेरीनगर, कोंढवा खुर्द, पुणे) अशी अटक केलेल्या तिघांची नावे आहेत. याप्रकरणी पिसोळीतील २६ वर्षीय तरुणाने कोंढवा पोलिसांत फिर्याद दिली होती, त्यानुसार गुन्हा दाखल करून तिघांना अटक केली आहे.

पोलिसांनी सांगितले की, पिसोळी (ता. हवेली) येथील धर्मावत पेट्रोल पंपाच्या पाठीमागील रस्त्यावरून फिर्यादी कामावरून घरी पायी जात होते. त्यावेळी आरोपींनी दुचाकी त्यांच्या जवळ नेत रोख एक हजार ७०० रुपये,एटीएम कार्ड आणि महत्त्वाची कागदपत्रे जबरदस्तीने चोरून नेली. कोंढवा पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सरदार पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सुरवसे पुढील तपास करीत आहेत.

get_footer();