आवृत्ती पुणे
← Back to Homepage

पूर्व वैमनस्यातून 26 वर्षीय युवकाचा खून करणारा जेरबंद

maharashtra jain warta • News Slider, Police, Previous Issue • November 9, 2021

वाकड पोलिसांत गुन्हा दाखल : आरोपीला पुणे रेल्वे स्टेशनवरून घेतले ताब्यात

महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क

पुणे : पूर्वी झालेल्या वादातून एका 26 वर्षीय युवकाचा खून करणाऱ्याला अटक केले असून, फरार आरोपीचा पोलीस शोध घेत आहेत. (गुरुवारी) 4 नोव्हेंबर रोजी रात्री 10 ते (शुक्रवारी) 5 नोव्हेंबर रोजी सकाळी 7 च्या दरम्यान ही घटना घडली. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली.

मृत्युंजय कुमार (वय 26, मूळ रा. बिहार), असे खून झालेल्या युवकाचे नाव आहे. याप्रकरणी सतीश वैजिनाथ वाव्हळ (वय 33, रा. रहाटणी) यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून, दोघांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

पोलिसांनी सांगितले की, पृथ्वी एंटरप्रायझेस या कंपनीच्या मजुरांना राहण्यासाठी रहाटणी येथील तापकीर मळ्याजवळ लेबर कॅम्प तयार करण्यात आला आहे. यामध्ये मृत्यूंजय, पंचानंद व मांझी हे तिघे राहत होते. मृत्युंजय आणि आरोपी यांच्यात एक महिन्यापूर्वी वाद झाला होता.

या वादाचा राग मनात धरून आरोपींनी संगनमत करून मृत्युंजयच्या डोक्यात अज्ञात वस्तूने जबर घाव घातला. यात मृत्यूंजयला जबर मार लागल्याने त्याचा मृत्यू झाला. यानंतर दोघे आरोपी पसार झाले. ही घटना शुक्रवारी सकाळी 7 च्या सुमारास समोर आली. पोलिस घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर मृत्यूंजयच्या घरच्यांना कळवण्यात आले.

दरम्यान, या प्रकरणी पंचानंद मुन्ना राम (वय 21) आणि जवाहर मांझी (दोघेही रा. मूळ बिहार) यांच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला.तसेच आरोपी पंचानंद याला पुणे रेल्वे स्टेशन येथून पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. आरोपी मांझी हा पसार असुन त्याचा शोध सुरू आहे.

get_footer();