आवृत्ती पुणे
← Back to Homepage

पायी गस्तीमध्ये रेकॉर्डवरील आरोपीला अटक

maharashtra jain warta • News Slider, Other, Police, Previous Issue, Social • June 30, 2023

महाराष्ट्र न्युज नेटवर्क

पुणे : पोलिस स्टेशन हद्दीत नियोजित पायी गस्त घालत असताना शिवाजीनगर पोलिसांच्या तपास पथकाने कोल्हापुर पोलिसांना हवा असलेल्या आरोपीला शिताफीने अटक केली. सादिक अली आर. सरगिरो उर्फ दादू, वय वर्षे 28 मूळ राहाणार हुबळी, कर्नाटक असे आरोपीचे नाव आहे.

शिवाजीनगरच्या इराणी वस्तीत सादिक अली येणार असल्याची खबर गस्तीवरील पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार कारवाई करत त्यांनी शिताफीने आरोपीला अटक केली.
आरोपीची अधिक चौकशी केली असता तो शाहुपुरी पोलिस स्टेशनमध्ये नोंदलेल्या गुन्ह्यातला हवा असणारा आरोपी असल्याचे समजले. त्याबाबत शाहुपुरी पोलिस स्टेशन, पोलिस निरिक्षक यांच्याशी संपर्क साधून खातरजमा केली.
शाहुपुरी पोलिसांशी समन्वय साधून, आरोपीची वैद्यकीय तपासणी करून त्याला हवाली करण्यात आले आहे.
सदर कारवाई पुणे शहर पश्चिम प्रादेशिक विभागाचे अपर पोलीस आयुक्त प्रविणकुमार पाटील, परिमंडळ- ०१, पुणे शहराचे पोलीस उपायुक्त संदीपसिंह गिल्ल, पुणे शहर विश्रामबाग विभागाचे सह. पोलीस आयुक्त वसंत कुंवर, शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद माने, गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विक्रम गौड यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे पोलीस उप-निरीक्षक प्रताप साळवे, पोलिस उपनिरिक्षक विशाल शिंदे, ग्रेड पोलीस उप-निरिक्षक सावंत, सहायक पोलिस फौजदा भिवरे, पोलीस अंमलदार राजपुत, सोनवणे, साठे, शिंदे, कांबळे यांनी पार पाडली.

get_footer();