आवृत्ती पुणे
← Back to Homepage

चार वर्षांपासून पोलिसांना गुंगारा देणाऱ्यास ठोकल्या बेड्या

maharashtra jain warta • News Slider, Police, Previous Issue • January 27, 2022

विमानतळ पोलिसांची कारवाई : विमाननगर येथील हयात हॉटेलजवळ पकडले

महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क

पुणे : चार वर्षांपासून पोलिसांना गुंगारा देणाऱ्या सराईत गुन्हेगाराला विमानतळ पोलिसांनी बेड्या ठोकल्या.

सोमनाथ भीमराव वाघमारे (वय ३९, रा. गांधीनगर, येरवडा, पुणे, सध्या रा. मार्केट कमिटीमागे सांगोला, जि. सोलापूर) असे अटक केलेल्या सराईत गुन्हेगाराचे नाव आहे.

विमानतळ पोलीस स्टेशनचे तपास पथकातील पोलीस नाईक महाजन यांना रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार विमाननगर येथील हयात हॉटेलजवळ थांबल्याची माहिती सू्त्रांकडून मिळाली. त्यानुसार पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांना पाहता आरोपीने पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी शिताफीने पाठलाग करून त्याला पकडले. अधिक तपास केला असता त्याच्यावर विमानतळ पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल असल्याचे निष्पन्न झाले. शहरामध्ये इतर पोलीस स्टेशनला आरोपीविरुद्ध गुन्हे दाखल आहेत, का याबाबत तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.

अपर पोलीस आयुक्त नामदेव चव्हाण, पोलीस उपायुक्त रोहिदास पवार, सहायक पोलीस आयुक्त किशोर जाधव, विमानतळ पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भरत जाधव, पोलीस निरीक्षक (गुन्हे) मंगेश जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस फौजदार अविनाश शेवाळे, पोलीस अंमलदार रमेश लोहकरे, उमेश धेंडे, रुपेश मिसाळ, विनोद महाजन, हारुण पठाण, किशोर अब्दागिरे यांच्या पथकाने ही कामगिरी केली.

get_footer();