आवृत्ती पुणे
← Back to Homepage

भयभीत नवविवाहितेस दामिनी पथकाची मदत

maharashtra jain warta • News Slider, Police, Previous Issue • August 21, 2021

मिठगंज पोलीस चौकी : मंडई पोलीस चौकीमध्ये हरविल्याची तक्रार

महाराष्ट्र ३६० न्यूज

पुणे : पळून जाऊन लग्न केलेल्या मुलीच्या वडिलांनी पोलिसांत ती हरवल्याची तक्रार दिल्यानंतर भयभीत झालेल्या या नवविवाहितेस दामिनी पथकाने मदत करत आधार दिला.

लोणी काळभोर (ता. हवेली) येथील एका मुलीने पळून जाऊन लग्न केले. दरम्यान, तिच्या आई-वडिलांनी पुण्यातील महात्मा फुले मंडई पोलीस चौकीमध्ये मुलगी हरविल्याची तक्रार दिली होती. दामिनी पथकातील महिला पोलीस गस्तीवर होत्या, त्या वेळी त्यांना मिठगंज पोलीस चौकीजवळ घाबरलेल्या अवस्थेतील मुलीने मदत मागितली. तिची चौकशी करून दामिनी पथकाने मदत केल्याचे महिला पोलीस शिपाई श्वेता वलेकर यांनी सांगितले

  दरम्यान, दामिनी पथकातील महिला पोलीस शिपाई श्वेता वलेकर आणि सुजाता व्हनहुवे यांनी मिठगंज पोलीस चौकीचे पोलीस शिपाई सचिन चव्हाण, आर. एन. वाघमारे यांना मुलीविषयी माहिती दिली. त्यांच्या मदतीने मंडई पोलीस चौकीतील पोलिसांना बोलावून त्या मुलीला त्यांच्या ताब्यत दिले.
get_footer();