आवृत्ती पुणे
← Back to Homepage

गजा मारणे टोळीचा हस्तक संतोष तोंडे स्थानबद्ध

maharashtra jain warta • News Slider, Police, Previous Issue • September 19, 2021

कोथरूड पोलिसांची एमपीडीए कायद्यान्वये कारवाई : मागील १५ वर्षांत आठ गुन्हे दाखल

महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क

पुणे : गजा मारणे टोळीचा हस्तक संतोष तोंडे याला कोथरूड पोलिसांची एमपीडीए कायद्यान्वये कारवाई करत स्थानबद्ध केले आहे. मागील १५ वर्षांत त्याच्यावर विविध प्रकारचे आठ गुन्हे दाखल आहेत.

कोथरुड पोलीस स्टेशन हद्दीत गुन्हे करणारा अट्टल गुन्हेगार संतोष पांडुरंग तोंडे (वय ३८, सुतारदरा, कोथरूड, पुणे, सध्या रा. मु. पो. खेचरे, ता. मुळशी, जि. पुणे) हा रेकॉर्डवरील सराईत गुन्हे करणारा गुन्हेगार आहे. तो गजा मारणे टोळीचा हस्तक असून, त्याने गजा मारणे कारागृहातून बाहेर आल्यावर काढलेल्या रॅलीची व्हिडीओ क्लिप व्हायरल केली होती. त्याने त्याचे साथीदारांसह कोथरूड, हडपसर तळेगाव दाभाडे पोलीस ठाणे, पुणे हद्दीत दुखापत, दरोडा तयारी, दंगा, खंडणी, वाहनांची तोडफोड, जबरी चोरी, बेकायदा हत्यार बाळगणे यासारखे गंभीर स्वरूपाचे गुन्हे केले आहेत. मागील १५ वर्षामध्ये त्याचेविरुद्ध एकूण ८ गुन्हे दाखल आहेत. त्याच्या गुन्हेगारी कृत्यांमुळे सदर परिसरातील सार्वजनिक सुव्यवस्थेस बाधा निर्माण झालेली होती.

गजानन मारणे हा तळोजा कारागृहा येथून बाहेर आल्यानंतर संतोष तोंडे याने इतर साथीदारांसह चारचाकी वाहनांसह एकत्रित तळोजा कारागृह येथून गजा मारणे याच्या २०० ते ३०० इतर समर्थकांसह चारचाकी वाहनाने मुंबई ते पुणे हायवेने रस्ता ब्लॉक करत कोणताही टोल न भरता कायद्याचे उल्लंघन करत रॅली काढली होती. सदर प्रवासादरम्यान त्याने व गजानन मारणे यांच्या इतर समर्थकांनी मुळशी पॅटर्न चित्रपटामधील डायलॉगची क्लिप तयार करुन “आला रे आला, तुमचा बाप आला” अशा मजकुराची घोषणा असलेली क्लिप व्हायरल करुन जनतेत दहशत निर्माण केली होती. तो पुणे शहरातील कोथरुड, हडपसर, तळेगाव दाभाडे पोलीस स्टेशनचे हद्दीत राहणारे रहिवासी लोकांच्या आणि व्यवसाय चालविणाऱ्या व्यावसायिकांच्या जीवितास आणि मालमत्तेस धोका बनलेला होता. वेळप्रसंगी तो दमदाटी, मारहाण करुन शस्त्राचा धाक दाखवून खंडणी व जबरी चोऱ्या करत होता.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक मेघशाम डांगे (तत्कालीन) आणि महेंद्र जगताप, यांनी एमपीडीए कायदयान्वये नमूद गुन्हेगारास स्थानबद्ध करण्याकामी प्रस्ताव तयार करून पोलीस आयुक्त, पुणे शहर यांचेकडे सादर केला होता. पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी प्रस्तावाची पडताळणी करुन नमुद गुन्हेगाराविरुद्ध १५ सप्टेंबर रोजी एमपीडीए कायदयान्वये एक वर्षाकरीता स्थानबद्धतेचा आदेश पारीत केले आहे.

पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी सक्रिय व दहशत निर्माण करणाऱ्या अट्टल गुन्हेगारांवर कडक प्रतिबंधक कारवाई करण्याचे धोरण अवलंबिले आहे. त्यानुसार मागील १० महिन्यांच्या कालावधीमध्ये ३६ गुन्हेगारांना एमपीडीए कायदयान्वये स्थानबध्द केले आहे. यापुढेही सराईत व अट्टल गुन्हेगारांचे कृत्यांना आळा घालण्यासाठी या प्रमाणे कारवाई करण्याचे ठरविले आहे.

get_footer();