आवृत्ती पुणे
← Back to Homepage

गंगानगरमध्ये पूर्ववैमनस्यातून लॉन्ड्रीचालकाचा निर्घृण खून

maharashtra jain warta • News Slider, Police, Previous Issue • February 8, 2022

हडपसर पोलिसांत फिर्याद : संशयावरून चार-पाचजणांना घेतले ताब्यात

महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क

पुणे : पूर्ववैमनस्यातून लॉन्ड्रीचालकाचा कोयत्याने वार करून निर्घृण खून केल्याची घटना गंगानगरमधील माऊली कॉलनीमध्ये गल्ली क्र.९ मध्ये घडला. ही घटना सोमवारी (दि. ७ फेब्रुवारी) सायंकाळी पाचच्या सुमारास घडली. पोलिसांनी संशयावरून चार-पाचजणांना ताब्यात घेतले आहे.

लॉन्ड्री व्यावसायिक गणेश शशिकांत महापुरे (वय १९, रा. गंगानगर, फुरसुंगी, हडपसर) असे खून झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी सिद्धेश शशिकांत महापुरे (वय २७, रा. गंगानगर, फुरसुंगी, हडपसर) यांनी हडपसर पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली.

पोलिसांनी सांगितले की, घटनेचे वृत्त समजताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद गोकुळे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) दिगंबर शिंदे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. पोलिसांनी चार-पाच संशयितांना ताब्यात घेतले आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली. दरम्यान, गणेश महापुरे याचे बारावीपर्यंत शिक्षण झाले होते. मात्र, त्याला व्यवसाय करण्याची इच्छा असल्याने त्याच्या कुटुंबीयांनी राहत्या घरासमोर लॉन्ड्रीचे दुकान सुरू करून दिले होते.

गंगानगरमध्ये मागिल दोन वर्षांपूर्वी एका मागोमाग एक असे सलग तीन खून झाले होते. त्यानंतर हडपसर पोलिसांनी गुन्हेगारांना जेरबंद केले, तर काहींना तडीपार करून गुन्हेगारांना ठोकून काढले. त्यामुळे हडपसर परिसरात शांतता होती. मात्र, पुन्हा या खुनामुळे पूर्ववैमनस्यातून खून सत्र सुरू होते की काय, अशी शंका येथील नागरिकांनी व्यक्त केली आहे.

get_footer();