आवृत्ती पुणे
← Back to Homepage

गॅस सिलेंडर डिलिव्हरी करणाऱ्यास कोयत्याच्या धाकाने लुटणारा सराईत जेरबंद

maharashtra jain warta • News Slider, Police, Previous Issue • August 31, 2021

खडक पोलिसांची कारवाई : भवानी पेठेतील चुडामन तालमीजवळ लुटीचा घडला होता प्रकार

पुणे : महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क

तडीपार गुन्हेगाराने भवानी पेठेतील चुडामन तालमीजवळ भारत गॅस सिलेंडरची डिलिव्हरी करणाऱ्याला अडवून कोयत्याचा धाक दाखवून दहा हजार रुपये जबरदस्तीने काढून घेतले. त्यानंतर त्याच्या हातातील मोबाईल भिंतीवर आपटून नागरिकांमध्ये दहशत केली.

आरबाज ऊर्फ बबन शेख असे अटक केलेल्याचे नाव आहे. याप्रकरणी मांगुसिंग रामसिंग मांगलिया यांनी खडक पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली होती. त्यानुसार त्याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी सांगितले की, तडीपार गुन्हेगार आरबाज ऊर्फ बबन शेख याचा तपास खडक पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीहरी बहिरट यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार फहिम सैय्यद करीत होते. त्यावेळी त्यांना माहितगार सूत्रांकडून माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी शंकरशेठ रोडवरील शिवशक्ती रिक्षा स्टँड येथे आरोपीला पकडले. त्याच्याकडून एक हजार ७०० रुपये रोख, कोयता असा ऐवज जप्त केला. दरम्यान, आरोपीची पार्श्वभूमी पाहता त्याच्याविरुद्ध खडक, समर्थ, लष्कर पोलीस स्टेशनमध्ये मारमारी, घातक शस्त्र बाळगने, घरफोडी, खंडणी मागणे, जबरी चोरी, विनयभंग असे गंभीर गुन्हा दाखल असल्याचे निदर्शनास आले. त्याला पोलीस उपायुक्त यांच्या कार्यालयीन तडीपार आदेशानुसार दोन वर्षे तडीपार केले. खडक पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक यशपाल सूर्यवंशी करीतआहेत.

get_footer();