आवृत्ती पुणे
← Back to Homepage

घरफोडी व चोरीच्या गुन्ह्यातील चौघांना ठोकल्या बेड्या

maharashtra jain warta • News Slider, Police, Previous Issue • November 3, 2021

दरोडा व वाहनचोरी पथक-२ची कारवाई : ३७ लाख ६० हजार ६६० रुपयांचा मुद्देमाल जप्त

महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क

पुणे : घरफोडी चोरीच्या गुन्ह्यातील चार आरोपींसह चोरीचे सोने घेणाऱ्यास गुन्हे शाखेच्या दरोडा व वाहनचोरी पथक-२ने बेड्या ठोकल्या आहेत. आरोपीकडून ३७ लाख ६० हजार ६६० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

विश्वनाथ नानावत (वय ३१, रा. मु. पो. ओसाडे, ता. वेल्हा, जि. पुणे), नंदकिशोर वाघमल सोनी (रा. गुजरात), शामकुमार चुंनीलाल सोनी (रा. मध्य प्रदेश), सोनार अक्षय अशोक जैन (रा. मध्य प्रदेश) अशी अटक केलेल्या चौघांची नावे आहेत.

पोलिसांनी सांगितले की, येरवडा पोलीस स्टेशनमध्ये दाखल गुन्ह्याचा समांतर तपास सुरू होता. दरम्यान, या गुन्ह्यातील आरोपी हडपसर-आकाशवाणी येथे मित्राला भेटण्यासाठी येणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली. त्यानुसार दरोडा व वाहनचोरी पथक-२ने सापळा रचून आरोपीला शिताफीने पकडून ताब्यात घेतले.

आरोपींकडून अधिक तपास केला असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. गुन्ह्यातील चोरीचे सोने, चांदीचे दागिने, इतर किंमती वस्तू असा एकूण ३७ लाख ६० हजार ६६० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, पोलीस सहआयुक्त डॉ. रविंद्र शिसवे, अतिरिक्त पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, पोलीस उपायुक्त श्रीनिवास घाडगे, सहायक पोलीस आयुक्त लक्ष्मण बोराटे यांच्या मार्गदर्शनाखाली दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक-२चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील पंधरकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक विवेक पाडवी, पोलीस उपनिरीक्षक गुंगा जगताप, सहायक पोलीस फौजदार उदय काळभोर, पोलीस हवालदार राजेश अभंगे, दिनकर लोखंडे, राजेश लोखंडे, विनायक रामाणे, शाकिर खान, पो.ना. सुदेश सपकाळ, गणेश लोखंडे, शिवाजी जाधव, दत्तात्रय खरपुडे, पोलीस शिपाई अमोल सरतापे यांच्या पथकाने ही कारवाई केली.

get_footer();