आवृत्ती पुणे
← Back to Homepage

घरफोडी करणाऱ्या 3 सराईत गुन्हेगारांना ठोकल्या बेड्या

maharashtra jain warta • News Slider, Police, Previous Issue • February 16, 2022

लोणीकाळभोर पोलिसांची दमदार कामगिरी : दीड लाखांचा मुद्देमाल जप्त

महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क

पुणे : लोणी काळभोर परिसरात घरफोडी करणाऱ्या तीन सराईत गुन्हेगारांना लोणी काळभोर पोलिसांनी वडकी परिसरात बेड्या ठोकल्या. आरोपीकडून घरफोडीच्या गुन्ह्यातील दीड लाखांचे 30 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने जप्त केले.

शाहरुख विजय पवार (वय-27), बाज्या विजय पवार (वय-21), देवगुन विजय पवार (वय-19 सर्व रा. माप्तेमळा, ता. आटपाडी, जि. सांगली) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी यल्लाप्पा कलाप्पा सन्नके (रा. होळकरवाडी, मूळ- रा. सोलापूर यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

फिर्यादी हे गावी गेल्यानंतर त्यांच्या घराचे कुलुप तोडून घरातील 30 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने अज्ञात चोरट्यांनी चोरुन नेले होते. घरफोडीच्या गुन्ह्याचा तपास करत असताना तपास पथकातील पोलीस अंमलदार नितीन गायकवाड व सुनिल नागलोत यांना हा गुन्हा सराईत गुन्हेगार शाहरुख पवार व त्याच्या भावांनी केला असल्याची माहिती मिळाली. तसेच ते वडकी परिसरात आले असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी वडकी परिसरात तिघांचा शोध घेऊन त्यांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे सखोल चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. त्यांच्याकडून दीड लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. अटक करण्यात आलेल्या आरोपीपैकी देवगुन पवार हा लोणीकाळभोर पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या दोन घरफोडीच्या गुन्ह्यात फरार होता.

पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, पोलीस सहआयुक्त डॉ. रविंद्र शिसवे, अपर पोलीस आयुक्त नामदेव चव्हाण, पोलीस उपायुक्त नम्रता पाटील, सहायक पोलीस आयुक्त बजरंग देसाई, लोणी काळभोर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मोकाशी, पोलीस निरीक्षक गुन्हे सुभाष काळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक राजु महानोर, दिगंबर बिडवे, पोलीस हवालदार नितीन गायकवाड, सुनिल नागलोत, श्रीनाथ जाधव, संभाजी देविकर, दिगंबर साळुंके यांच्या पथकाने ही दमदार कामगिरी केली.

get_footer();