आवृत्ती पुणे
← Back to Homepage

घरफोडी करणाऱ्या चोरास अटक

maharashtra jain warta • News Slider, Police • July 16, 2021

सहकार नगर पोलीसांची कार्यवाही : ४ लाख ७३ हजाराचा माल हस्तगत

पुणे : संकेत डुंगरवाल
महाराष्ट्र 360 न्यूज नेटवर्क

   दिनांक- 19/01/2021 रोजी सहकारनगर पोलीस ठाणे कडील पोलीस उपनिरीक्षक सुधीर घाडगे व तपास पथकातील स्टाफ पोलीस स्टेशन  हद्दीत पेट्रोलिंग करत असताना पेट्रोलिंग दरम्यान पोलिस कर्मचारी संदीप ननवरे व भुजंग इंगळे यांना मिळालेल्या माहिती नुसार, निर्मल पार्क सोसायटी सहकारनगर पुणे येथे दुपारच्या सत्रात घराचे कुलूप तोडून सदर घरातील सोन्याचे दागिने चोरून नेणारा इसम हा शेवाळवाडी, तालुका.हवेली जिल्हा. पुणे येथे मांजरी फार्म पोस्ट ऑफिसजवळ साई फ्रुट स्टॉलवर त्याचे नातेवाइकांकडे येणार आहे. सदर ठीकाणी जाऊन पाहता बातमीच्या वर्णनातील इसम तेथे मिळुन आल्याने त्यास ताब्यात घेतले. त्यास त्याचे नाव पत्ता विचारले असता त्याने आपले नाव शशिकांत अनंत माने (वय 24 वर्ष) रा. हडपसर पुणे. यास ताब्यात घेऊन त्याच्याकडे सखोल तपास केला असता, त्याने खालील गुन्हे केल्याचे कबूल केले आहे.

सदर आरोपीकडून 02 घरफोड्या व 03 वाहन चोरी असे गुन्ह्यातील एकुण 4,73,100/- रुपयाचा माल हस्तगत केला आहे. सदर आरोपीची गुन्हेगारी पार्श्वभूमी पाहता त्याच्यावर आत्तापर्यंत घरफोडी वाहनचोरी जबरी चोरी व दरोडा असे पुणे शहर पुणे ग्रामीण पिंपरी चिंचवड भागात एकूण 28 गुन्हे दाखल आहेत

    सदरची कामगिरी ही मा.अप्पर पोलीस आयुक्त पुणे प्रादेशिक विभाग डॉ. संजय शिंदे, पोलीस उपायुक्त परिमंडळ-2 चे सागर पाटील, सहा. पोलीस आयुक्त, स्वारगेट विभाग सर्जेराव बाबर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक गोविंद गंभीरे, पोलीस निरीक्षक राजेंद्र कदम (गुन्हे)  यांच्या मार्गदर्शनाखाली सहकारनगर तपास पथकाचे पोलीस उप-निरीक्षक सुधीर घाडगे, पोलीस हवा बापू खुटवाड, विजय मोरे, पोलीस नाईक प्रकाश मरगजे, भुजंग इंगळे, संदीप ननवरे, सतीश चव्हाण, पोलीस शिपाई महेश मंडलिक, किसन चव्हाण, प्रदीप बेडिस्कर  व प्रदीप शिंदे यांच्या पथकाने केली आहे

get_footer();