आवृत्ती पुणे
← Back to Homepage

घरफोड्या करणाऱ्या सराईताच्या आवळल्या मुसक्या

maharashtra jain warta • News Slider, Police, Previous Issue • January 7, 2022

युनिट-६ची कारवाई : 30 घरफोडीचे गुन्हे उघड, 32 लाखांचा ऐवज जप्त

महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क

पुणे : शहरातील विविध पोलीस ठाण्याच्या हद्दीत घरफोडी करणाऱ्या सराईत गुन्हेगाराला गुन्हे शाखा युनिट-६च्या पथकाने बेड्या ठोकल्या आहेत. आरोपीने पुणे शहरात 30 घरफोडीचे गुन्हे केल्याचे तपासात निष्पन्न झाले असून पोलिसांनी त्याच्याकडून तब्बल 31 लाख 72 हजार 860 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.

अर्जुनसिंग रजपुतसिंग दुधानी (वय ४४, रा, पाण्याच्या टाकीजवळ, मांजरी बुद्रूक, पुणे) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. आरोपीला न्यायालयात हजर केले असता त्याला पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

लोणी काळभोर पोलीस ठाण्याच्या हद्दीत झालेल्या घरफोडीचा तपास युनिट सहाच्या पथकाकडे हा गुन्हा वर्ग करण्यात आला होता.
या गुन्ह्याचा तपास करत असताना हा गुन्हा सराईत गुन्हेगार अर्जुनसिंग दुधानी याने त्याच्या साथिदारासह केल्याची माहिती मिळाली. तसेच, दुधानी हा हडपसर येथील रामटेकडी येथे येणार असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून आरोपीला अटक केली. आरोपीची पोलीस कोठडी घेऊन सखोल चौकशी केली असता त्याने गुन्ह्यांची कबुली दिली. पोलिसांनी आरोपीकडून चोरीचा गुन्हा उघडकीस आणून 610 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने, ७८० ग्रॅम वजनाचे चांदीचे दागिने, ५५ हजार रुपये रोख, सॅन्ट्रो कार असा एकूण ३१ लाख ७२ हजार ८६० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.

आरोपीने चतु:श्रुंगी, येरवडा, विश्रांतवाडी, लष्कर, सिंहगड, अलंकार, स्वारगेट, मुंढवा, लोणीकंद, लोणी काळभोर, वानवडी,
हडपसर, कोंढवा पोलीस ठाण्याच्या हद्दीत घरफोडी आणि वाहन चोरी केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.

ही कामगिरी पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, पोलीस सहआयुक्त डॉ. रविंद्र शिसवे, अपर पोलीस आयुक्त गुन्हे रामनाथ पोकळे, पोलीस उपायुक्त गुन्हे श्रीनिवास घाडगे, सहायक पोलीस आयुक्त लक्ष्मण बोराटे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट-६चे पोलीस निरीक्षक गणेश माने, सहायक पोलीस निरीक्षक नरेंद्र पाटील, पोलीस उपनिरीक्षक सुधीर टेंगले, पोलीस अंमलदार मच्छिंद्र वाळके, विठ्ठल खेडकर, नितीन मुंढे, कानिफनाथ कारखेले, नितीन शिंदे, रमेश मेमाणे, बाळासाहेब सकटे, प्रतिक लाहिगुडे, ऋषिकेश ताकवणे, ऋषिकेश व्यवहारे, सचिन पवार, ऋषिकेश टिळेकर, शेखर काटे, नितीन धाडगे, ज्योती काळे व सुहास तांबेकर यांनी केली आहे.

get_footer();