आवृत्ती पुणे
← Back to Homepage

गुटखा विक्रेत्यांवर कोंढवा पोलिसांची मोठी कारवाई

maharashtra jain warta • News Slider, Police, Previous Issue • October 31, 2021

दोन टेम्पोंसह एकूण अठरा लाखांचा मुद्देमाल हस्तगत : तिघे ताब्यात, एक फरार

महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क

पुणे : गुटखा विक्रेत्यांवर कोंढवा पोलिसांची मोठी करवाई केली असून, या प्रकरणी दोन टेम्पोंसह एकूण अठरा लाखांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. तिघांना ताब्यात घेतले असून आणखी एकाचा शोध सुरू आहे.

दिनांक २१ ऑक्टोबर रोजी कोंढवा तपास पथकाचे पोलीस नाईक आल्हाट, जोतीबा पवार आणि अंमलदार चिंचकर यांना मिळालेल्या गोपनीय बातमीवरून शिवनेरीनगर, कोंढवा खुर्द, पुणे येथे एक इसम पिवळ्या रंगाच्या टेम्पोमधून तंबाखुजन्य गुटखा
पदार्थ विक्रीकरिता घेऊन येत आहे, अशी खात्रीलायक खबर मिळाल्याने वरिष्ठ पोलीस निरीक्षक सरदार पाटील, पोलीस निरीक्षक (गुन्हे) जगन्नाथ जानक, पोलीस निरीक्षक (गुन्हे) गोकुळ राऊत, कोंढवा पोलीस स्टेशन यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस
उपनिरीक्षक स्वप्नील पाटील, पोलीस हवालदार गरूड, कुंभार, पोलीस नाईक चिनके, पवार, चव्हाण, आल्हाट, देसाई, पोलीस अंमलदार होळकर आणि चिंचकर यांनी सदर ठिकाणी कारवाई केली असता, विजय देवारामजी गुजर (वय २४, रा. शिवनेरीनगर, कोंढवा खुर्द, पुणे) यास टेम्पो व तंबाखुजन्य गुटखा असा एकूण ३,०२,८६० रुपये किमतीच्या मुद्देमालासह ताब्यात घेण्यात आले.
सदर इसमाकडे अधिक तपास केला असता, त्याने सदर माल धर्मावत पेट्रोलपंपाच्या मागील बाजूस पिसोळी येथे पार्क केलेल्या टेम्पोमधून घेतल्याचे सांगितल्याने सदर ठिकाणी यांनी छापा टाकून महंमद रिझवान हनीफ अन्सारी ( वय २३), गुलफाम अब्दुल अन्सारी (वय २२), मुजम्मील साजीद अन्सारी (वय २२, तिघे रा. शिवनेरीनगर, कोंढवा खुर्द, पुणे) यांना ताब्यात घेऊन दोन टेम्पोंसह एकूण १८,८१,९५६ रुपये किमतीचा तंबाखुजन्य गुटखा ताब्यात घेण्यात आला.
त्याबाबत कोंढवा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींना न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्यांची पोलीस कोठडी मंजुर केली आहे. सदर कारवाईमध्ये कोंढावा पोलीसांनी एकूण २१,८४,८१६ रुपये किंमतीचा तंबाखूजन्य
गुटखा जप्त केला असून,
आरोपी आरीफ अन्सारी (रा. शिवनेरीनगर, कोंढवा बु. पुणे) याचा शोध सुरू आहे.
दाखल गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक स्वप्नील पाटील हे करीत आहेत. या कामगिरीबाबत कोंढवा पोलीस ठाण्याच्या सर्व पथकाचे पुणे पोलीस आयुक्तांनी अभिनंदन केले.

get_footer();