आवृत्ती पुणे
← Back to Homepage

हातचलाखीने टोच्या मारुन पंक्चर करणारा अटकेत

maharashtra jain warta • News Slider, Police, Previous Issue • November 15, 2021

खडकी पोलीस स्टेशनमध्ये मालकासह चौघांविरुद्ध गुन्हा :तीन हजार रुपये लुटले

महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क

पुणे : पंक्‍चरच्या दुकानमालकाने २५ पंक्‍चर दाखवून दुचाकीचालकाला तीन हजाराला लूटले. याप्रकरणी पंक्‍चर दुकानाच्या मालकासह चौघांविरुद्ध खडकी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

प्रशांत राजू वाघमारे (वय़ २८, रा. बोपोडी), फ्रान्सीस सनी अमोलीक (वय ५०, रा. बोपोडी) यांना अटक केली असून, त्यांच्या दोन साथीदारांविरुध्द गुन्हा दाखल आहे.

पोलिसांनी सांगितले की, फिर्यादी संदीप शिंदे (वय 35, रा. लोहगाव) हे शिवाजीनगरवरुन निगडीकडे दुचाकीवरुन चालले होते. यावेळी त्यांच्या मागून मोपेडवर येणाऱ्या दोघा आरोपींनी तुमच्या गाडीच्या मागच्या चाकात हवा कमी आहे. पुढे पंक्‍चरचे दुकान आहे तेथे दाखवा, असे सांगितले. त्यामुळे शिंदे यांनी पुढे असलेल्या पंक्‍चरच्या दुकानात गाडी दाखवली. यावेळी दुकानमालकाने गाडी पंक्‍चर नसताना ती पंक्‍चर असल्याचे सांगत गाडीला लहान लोखंडी टोच्याव्दारे २५ पंक्‍चर करुन ते काढले. यापोटी त्यांनी तब्बल तीन हजार रुपये शिंदे यांच्याकडून घेतले. याप्रकरणाचा तपास सहायक पोलीस निरीक्षक गणेश पाटील करत आहेत.

get_footer();