आवृत्ती पुणे
← Back to Homepage

हातगाडी लावण्यावरुन तरुणावर ब्लेडने सपासप वार

maharashtra jain warta • News Slider, Police, Previous Issue • September 2, 2021

बिबवेवाडी हद्दीतील घटना : आरोपीवर गुन्हा दाखल

महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क

हातगाडी लावण्याच्या कारणावरुन एका तरुणावर ब्लेडने सपासप वार केल्याची घटना बिबवेवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे. ही घटना मंगळवारी (दि.31) दुपारी चारच्या सुमारास बिबवेवाडी येथील शनि मंदिराजवळ घडली आहे.

सय्यद अली पठाण (वय-30 रा. शनि मंदिराजवळ अप्पर बिबवेवाडी) असे जखमी झालेल्या तरुणाचे नाव असून, त्याने बिबवेवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.पठाण याच्या तक्रारीवरुन पोलिसांनी आकाश शिंदे (वय ३०, रा. अप्पर बिबवेवाडी)
याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी आणि फिर्यादी यांच्यामध्ये हातगाडी लावण्यावरून वाद झाला. आरोपी आकाश शिंदे याच्या आईन फिर्यादी यांच्या घरच्यांना हातगाडी लावण्याच्या जागेवरून शिवीगाळ केली. पठाण याने आकाशला सांगितले की, तुझी आई विनाकारण माझ्या घरच्यांना हातगाडी लावण्याच्या जागेच्या कारणावरुन शिवीगाळ करते. तेव्हा तू तिला सांग असे सांगितले. याचा राग आल्याने आरोपी आकाश शिंदे याने पठाण याच्या गळ्यावर, उजव्या हातावर ब्लेडने वार केले. यामध्ये जखमी झालेल्या पठाण याने बिबवेवाडी पोलीस ठाण्यात शिंदे विरोधात फिर्याद दिली.

त्यानुसार पोलिसांनी आकाश शिंदे याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
पुढील तपास पोलीस करीत आहेत.

get_footer();