आवृत्ती पुणे
← Back to Homepage

आरोग्य विभाग पेपर फुटीप्रकरणी नौदलातील खलाशी जेरबंद

maharashtra jain warta • News Slider, Police, Previous Issue • December 7, 2021

सायबर पोलिसांकडून तपास सुरू : आरोपीला न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली

महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क

पुणे : राज्य आरोग्य विभागाच्यावतीने आरोग्य विभागातील गट ड या संवर्गातील पदाच्या भरतीसाठी ३१ ऑक्टोबर रोजी लेखी परीक्षा घेतली होती. या परिक्षेचे पेपर फोडून त्याची माहिती समाजमाध्यमांमध्ये प्रसारीत केली होती. याप्रकरणाचा तपास पुणे सायबर पोलीस करत असून, या प्रकरणात पोलिसांनी नेव्हल डॉकयार्डमध्ये (नौदल) खलाशी म्हणून कार्यरत असलेल्या एकाला अटक केली आहे. तो आरोपींच्या संपर्कात असल्याचे निर्दर्शनास आले आहे.

प्रकाश दिगंबर मिसाळ (वय ४०, रा. वराळे, ता. मावळ) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याला न्यायालयात हजर केले असताना न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे. याप्रकरणी आरोग्य विभागाच्या वतीने मुख्य प्रशासकीय अधिकारी स्मिता कारेगावकर यांनी पुणे सायबर पोलिसांकडे फिर्याद दिली होती. त्यानुसार सायबर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणात यापूर्वी विजय प्रल्हाद मुर्‍हाडे (रा. नांदी, ता. अंबड, जि. जालना), सुरेश रमेश जगताप (वय २८, रा. बोल्हेगाव, ता घनसांगावी, जि. जालना), संदिप शामराव भुतेकर (वय ३८, रा. सातारा परिसर, औरंगाबाद), अनिल दगडू गायकवाड (वय ३१, रा. किनगांववाडी, ता. अंबड), बबन बाजीराव मुंढे (वय ४८, रा. पळसखेड झालटा, ता. देउळगाव राजा, जि. बुलढाणा) आणि यांना अटक करण्यात आलेली आहे.

अटक करण्यात आलेल्या प्रकाश मिसाळ याचा मोबाईल आणि सीमकार्ड जप्त करण्यात आले आहे. त्याने आणखी कोणाला पेपर पाठवला आहे का? याचा तपास केला. तसेच मिसाळ याला पेपर पुरवणारा आरोपी याचाही माहिती मिळवायची आहे. अटक आरोपीने पेपर मिळवण्यासाठी तसेच पेपरचे वितरण करण्यासाठी इतर कोणत्या साथीदाराच्या संपर्कात होता त्याचे शोध घेणे, आरोपीकडून मूळ हस्तलिखित प्रश्नोत्तर स्वरुपातील पेपर हस्तगत करुन त्या प्रमाणे हस्ताक्षरांचे नमूने घेयचे असल्याचा युक्तीवाद सहायक सरकारी वकील विजयसिंह जाधव यांनी करुन न्यायालयाकडे आरोपीची पोलीस कोठडीची मागणी केली. त्यानुसार न्यायालयाने आरोपीला 10 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भुतेकर हा निवृत्त जवान आहे. तो 2019 मध्ये लष्करातून निवृत्त झाला आहे. तो औरंगाबाद येथे सैन्य भरती पूर्व प्रशिक्षण देणारी नवस्वराज्य नावाने करिअर ॲकडमी चालवितो. तर मिसाळ हा डॉकयार्ड येथे खलाशी आहे. मिसाळ याचा एक नातेवाईक बीडमध्ये शिक्षक आहे. त्याच्याकडून मिसाळ याला पेपर मिळाला होता. मिसाळ याने तो तीन एजंटांना व भुतेकर याला दिला होता. दोघांनी त्यांच्याकडील उमेदवारांना सकाळी सहा वाजता बोलवून 92 प्रश्न व त्याची उत्तरे सांगत ती पाठ करून घेतली होती. मिसाळ याने एजंटामार्फत चाकण परिसरात 30 उमेदवारांना बोलवून उत्तरे सांगितली. तर भुतेकर याने 23 विद्यार्थ्यांकडून उत्तरे पाठ करून घेतल्याचे समोर आले आहे. मिसाळ याला मदत करणारे दोन एजंट अद्याप फरार आहेत.

get_footer();