आवृत्ती पुणे
← Back to Homepage

गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केली पोलिसांसाठी महत्त्वपूर्ण घोषणा

maharashtra jain warta • News Slider, Police, Social • July 16, 2021

महाराष्ट्र पोलिसांसाठी एक लाख घरे

पुणे : संकेत डुंगरवाल
महाराष्ट्र 360 न्यूज नेटवर्क

महाराष्ट्रातील पोलिसांसाठी एक लाख घरे बांधली जाणार, अशी महत्त्वपूर्ण घोषणा राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केली. नागपूरमध्ये पोलिस महासंचालक शिबीर कार्यालयासह पाचपावली व इंदोरा येथील पोलीस अमलदारांचे शासकीय निवासस्थानाच्या उद्धाटन प्रसंगी केली घोषणा.

राज्यात पोलिसांसाठी घरे खूप कमी आहेत. त्यामुळे ते बांधण्यासाठी प्रयत्न सुरु केले आहेत. एखादा बिल्डर आपल्या जागेवर पोलिसांसाठी घर बांधून देत असेल, तर त्याला 4 एफएसआय आणि इतर सुविधा देण्याचा विचार सुरु आहे. ही सर्व घरं पोलीस हाऊसिंग कॉर्पोरेशनच्या नावानेच बांधली जाणार आहेत. जवळपास एक लाख घरं महाराष्ट्र पोलिसांसाठी बांधण्याची तयारी करण्यात येत आहे. कोरोनामुळे राज्य शासनाच्या भरवशावर राहून घर बांधली जाऊ शकणार नाही. त्यासाठी वेगवेगळ्या पद्धती वापरुन पोलीस विभागातूनच घर बांधली जातील असेही गृहमंत्री अनिल देशमुख म्हणाले.

get_footer();