आवृत्ती पुणे
← Back to Homepage

घरगुती सामान मुंबईला पोहचविण्यासाठी खंडणी मागणारा जेरबंद

maharashtra jain warta • News Slider, Police, Previous Issue • February 1, 2022

मुंढवा पोलिसांत फिर्याद : सन लाईफ पॅकर्स अँड मुव्हर्स व धारेश्वर पॅकर्स अ‍ॅन्ड मुव्हर्सच्या मालकांविरूध्द गुन्हा

महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क

पुणे : पुण्यातून मुंबईच्या घरी पोहचविण्यासाठी घरगुती सामान घरी न पोहोचविता टेम्पोच्या लोकेशनसाठी 5 हजार रुपयांची अधिक मागणी करणाऱ्याला जेरबंद केले असून, चौघांवर गुन्हा दाखल केला आहे. पैसे दिले नाही तर सामानाचे नुकसान करु व तुमचे सामान विसरुन जा, अशी धमकी दिली. त्यानंतर वर्मा यांनी मुंढवा पोलिसांकडे धाव घेतली आहे.

याप्रकरणी अभिनव अविनाश वर्मा (वय ३०, रा. केशवनगर, मुंढवा) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार टेम्पोचालक रामदास शेलार, विजय पाटील, अश्विन रघुनाथ रायकर (वय २७, सर्व रा. धायरीगाव) यांच्यावर गुन्हा दाखल केला असून, अश्विन रायकर याला अटक करण्यात आली आहे.

पोलिसांनी सांगितले की, अभिनव वर्मा यांनी त्यांचे घरगुती सामान मुंबईतील घरी हलविण्यासाठी सन लाईफ पॅकर्स अँड मुव्हर्स, धारेश्वर कार्गो पॅकर्स अँड मुव्हर्स यांना दिले. त्यांनी २९ जानेवारी रोजी दुपारी चार वाजता केशवनगर येथील घरातून ९ लाख १० हजार रुपयांचे घरगुती साहित्य व दुचाकी टेम्पोत भरून घेऊन गेले. दुसर्‍या दिवशी त्यांच्या मुंबईतील घरी साहित्य पोहचले नाही. तेव्हा त्यांनी चौकशी करुन टेम्पो कोठे आहे, याची विचारणा केली. तेव्हा टेम्पोचे लोकेशन पाहिजे असल्यास आणखी ५ हजार रुपये द्यावे लागेल.

पैसे दिले नाही तर सामानाचे नुकसान करु व तुमचे सामान विसरुन जा, अशी धमकी दिली. त्यानंतर वर्मा यांनी मुंढवा पोलिसांकडे धाव घेतली आहे. मुंढवा पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक ब्रम्हानंद नाईकवाडी यांच्या मार्गदर्शनाखाली महिला पोलिस उपनिरीक्षक भोसले अधिक तपास करीत आहेत.

get_footer();