आवृत्ती पुणे
← Back to Homepage

देशी बनावटीचे पिस्टल व जिवंत काडतुसे बाळगणारा जेरबंद

maharashtra jain warta • News Slider, Police, Previous Issue • January 29, 2022

गुन्हे शाखा युनिट-३ची कारवाई : ४० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त

महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क

पुणे : उत्तमनगर पोलीस स्टेशनमध्ये देशी बनावटीचे पिस्टल आणि दोन जिवंत काडतुसे बाळगणाऱ्यास गुन्हे शाखा युनिट-३च्या पथकाने जेरबंद केले. त्याच्याकडून ४० हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला असून, त्याच्याविरुद्ध फरासखाना पोलीस स्टेशनमध्ये विनयभंग, खंडणी, दरोड्याची तयारी, खुनाचा प्रयत्न असे गुन्हे असल्याचे उघडकीस आले.

योगेश बाबुराव पाटणे (वय ३९, रा. प्रगती अपार्टमेंट, कसबा पेठ, पुणे) असे अटक केलेल्याचे नाव आहे.

गुन्हे शाखा युनिट-३चे पोलीस अधिकारी-कर्मचारी उत्तमनगर पोलीस स्टेशन हद्दीमध्ये गस्त घालत होते. त्यावेळी रेकॉर्डवरील गुन्हेगार एच. एच. मोरे कॉम्प्लेक्सजवळील सार्वजनिक रस्त्याच्या कडेला थांबला असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली. त्यानुसार पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत सापळा रचून आरोपीला ताब्यात घेतले. त्याची अंगझडती घेतली त्याच्याकडे एक पिस्टल, दोन जिवंत काडतुसे असा एकूण ४० हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. त्याच्याविरुद्ध उत्तमनगर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला आहे.

पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, पोलीस सहआयुक्त डॉ. रवींद्र शिसवे, अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, पोलीस उपायुक्त श्रीनिवास घाडगे, सहायक पोलीस आयुक्त गजानन टोम्पे यांच्या मार्गदर्शनाखाली गु्न्हे शाखा युनिट-३चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अभय महाजन, पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय काळे, पोलीस अंमलदार महेश निंबाळकर, संतोष क्षीरसागर, राजेंद्र मारणे, रामदास गोणते, विल्सन डिसोझा, संजीव कळंबे, सोनम नेवसे, राकेश टेकावडे, दीपक क्षीरसागर, प्रकाश कट्टे, भाग्यश्री वाघमारे, सुजीत पवार यांच्या पथकाने ही कामगिरी केली.

get_footer();