आवृत्ती पुणे
← Back to Homepage

होंडासिटी कारच्या धडकेत दुचाकीवरील दोघेजण गंभीर जखमी

maharashtra jain warta • News Slider, Police, Previous Issue • October 29, 2021

कोंढवा पोलिसात गुन्हा : कौसरबाग रस्त्यावर पहाटे अडीचच्या सुमारास घडली घटना

महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क

पुणे : भरधाव वेगातील होंडासिटीची दुचाकीला धडक बसून झालेल्या अपघातात दोघे गंभीर जखमी झाले. ही घटना गुरुवारी (दि. २८ ऑक्टोबर) पहाटे अडीचच्या सुमारास कॅपिटल मॉलसमोर, कौसरबाग रोड, कोंढवा येथे घडली.

अनुप शिंदे आणि त्यांचा मुलगा अपघातात गंभीर जखमी झाले आहे. याप्रकरणी सुबोध लहानुज बगाडे (वय ३१, रा. ताडीवाला रोड, पुणे, मू. रा. मु.पो. हाळगव्हाण, ता. अंजनगाव सुर्जी, जि. अमरावती) यांनी कोंढवा पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली असून, त्यानुसार रिद्धीराज रबिनकर (वय २६, रा. वेदांत, कडनगर चौक, उंड्री, पुणे, मूळ रा. संजीवनी हॉस्पिटल, कोलकत्ता) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी सांगितले की, फिर्यादीच्या गाडीला कौसरबाग रोड येथे गुरुवारी पहाटे अडीचच्या सुमारास कॅपिटलमॉलसमोर भरधाव वेगातील होंडा सिटी कार क्र. एमएच-१२-जेयू-०३२३ची दुचाकीला धडक बसून अपघात झाला. या अपघातात दोघे गंभीर जखमी झाले असून, गाडीचे नुकसान करून फिर्यादी घटनास्थळावरून पळून गेला. दरम्यान, कोंढवा पोलिसांना माहिती मिळाल्यानंतर पोलीस उपनिरीक्षक समाधान मचाले यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. पुढील तपास कोंढवा पोलीस करीत आहेत.

get_footer();