आवृत्ती पुणे
← Back to Homepage

हॉस्पिटलमधून डोळे तपासणी मशीन चोरणारी दुकली’ गजाआड

maharashtra jain warta • News Slider, Police, Previous Issue • September 20, 2021

भारती विद्यापीठ पोलिसांची कारवाई

महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क

पुणे : हॉस्पिटलचे कुलूप तोडून डोळे तपासणीचे महागडे मशीन चोरुन नेल्याची घटना 9 सप्टेंबर रोजी सकाळी पुण्यातील श्री साईनाथ हॉस्पिटलमध्ये उघडकीस आली होती. या गुन्ह्यामध्ये भारती विद्यापीठ पोलिसांनी दोघांना अटक करुन 2 लाख 75 हजार रुपये किमतीची मशीन जप्त केली आहे.

सुरेश कानदास वैष्णव (वय-30 रा. लेदरमेल ता. बिनमाल, राजस्थान), प्रकाश गौराराम माली (वय-31 रा. सिद्धीविनायक सोसायटी, जांभुळवाडी रोड, पुणे, मुळ रा. राजस्थान) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. याबाबत डॉ. संभाजी किसन मांगडे (रा. धनकवडी) यांनी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी सांगितले की, फिर्यादी यांचे त्रिमुर्ती चौकात श्री साईनाथ हॉस्पिटल आहे. 8 सप्टेंबर रोजी रात्री हॉस्पिटल बंद असताना आरोपींनी कुलूप तोडून हॉस्पिटलमध्ये प्रवेश केला. हॉस्पिटलमध्ये डोळे तपासणी करण्याची महागडी मशिन चोरुन नेली. 9 सप्टेंबर रोजी सकाळी नऊच्या सुमारास मशीन चोरीला गेल्याचे समोर आले. या गुन्ह्यातील आरोपींचा शोध घेऊन दोघांना अटक करुन त्यांच्याकडून मशीन जप्त केली आहे.

आरोपी हे चश्मे बनवण्याचे काम करत असून त्यांनी अशा प्रकारचे आणखी गुन्हे केले आहेत का याचा तपास पोलीस करीत आहेत.

पोलीस उपायुक्त परिमंडळ 2 सागर पाटील, सहायक पोलीस आयुक्त सुषमा चव्हाण, वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगन्नाथ कळसकर,
पोलीस निरीक्षक गुन्हे संगीता यादव, पोलीस निरीक्षक विजय पुराणिकयांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे पोलीस उपनिरीक्षक नितीन शिंदे, अंकुश कर्चे, पोलीस अंमलदार रविंद्र भोसले, रविंद्र चिप्पा, गणेश सुतार, सचिन पवार, निलेश खोमणे, योगेश सुळ, हर्षल शिंदे, अभिजीत जाधव, गणेश शेंडे, राहूल तांबे, धनाजी धोत्रे, नवनाथ खताळ, सचिन गाडे, शिवदत्त गायकवाड, आशिष गायकवाड, विक्रम सावंत, जगदीश खेडकर यांच्या पथकाने ही कारवाई केली.

पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक धीरज गुप्ता करीत आहेत.

get_footer();