आवृत्ती पुणे
← Back to Homepage

मानवता प्रतिष्ठानचा एक हजार मोफत विवाहांचा संकल्प

maharashtra jain warta • News Slider, Previous Issue, Social • January 21, 2022

महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क

पुणे : कोरोना काळात गरीब श्रीमंतांनी निर्बंधांमुळे आटोपशीर विवाह सोहळे पार पाडले. याच सर्वसामान्य विवाह पध्दतीलाच समाजमान्यता लाभावी यासाठी प्रयत्नशील असणाऱ्या मानवता प्रतिष्ठानने तेहत्तीस मोफत विवाह सोहळ्यानंतर एक हजार विवाह मोफत करून देण्याचा संकल्प केला आहे.

कोरोनामुळे सर्वसामान्यांच जगणं कठीण झाल आहे. उध्वस्त झालेल्या कुटुंबातील मुलामुलींची लग्ने खोळंबली आहेत. हा सामाजिक प्रश्न पुढे जाऊन अधीक गंभीर होण्यापुर्वी कात्रजचे मानवता प्रतिष्ठान, विकासनाना फाटे मित्र परिवार, साईनाथ मित्र मंडळ, आणि यंत्रनिर्माण पतसंस्थेने पुढे येवून गेल्यावर्षी सर्वधर्मीय तेहतीस मोफत लग्न लावून समाजाला एक आदर्श घालून दिला होता. कोरोना निर्बंधात होणाऱ्या आटोपशीर लग्नांप्रमाणेच यापुढेही कमी खर्चात आणि कमी लोकांच्या उपस्थितीत शिस्तबध्द पध्दतीने लग्नं व्हावीत. समाजातील गरीब, श्रीमंत व सर्वधर्मीयांनी हिच लग्नपध्दती स्विकारावी. या परिवर्तनवादी लग्नपध्दतीचा स्विकार सर्वांनी करावा यासाठी एक हजार मोफत शिस्तबध्द विवाह लावून देण्याचा संकल्प विकास फाटे यांनी केला आहे. या समाजोपयोगी उपक्रमाची माहिती प्रसारित होताच अत्यंत गरजू पंधरा कुटुंबांनी विवाहांची नोंदणी केली आहे.

हा संकल्प पुर्ण व्हावा यासाठी लोकसहभागाचे अवाहनही करण्यात आले आहे. आटोपशीर विवाह पध्दती हि एक सामाजिक चळवळ व्हावी आणि त्यासाठी समाजातील सर्वस्तरातून प्रतिसाद मिळवण्यासाठी मानवता प्रतिष्ठान सक्रीय झाले आहे. या उपक्रमासाठी प्रतिष्ठानाचे विकासनाना फाटे, शंकर निंबाळकर, ज्ञानेश्वर कुंभार प्रशांत फाटे, विनितेश फाटे, संकेत फाटे, संदीप आवारे, योगेश फाटे, अथर्व फाटे, योगेश मोरे व चंद्रकांत फाटे अथक परिश्रम घेत आहेत.

get_footer();