आवृत्ती पुणे
← Back to Homepage

‘चेअरमनने किया वैसाही मै करुंगा’ !

maharashtra jain warta • News Slider, Previous Issue • December 8, 2021

कोंढवा पोलिसांत गुन्हा : लुल्लानगरमधील सोसायटीमध्ये घडला प्रकार

महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क

पुणे : सोसायटीमधील वादातून चेअरमनविरोधात विनयभंगाची तक्रार दिल्यानंतर सोसायटीमधील एका सदस्याने हा गुन्हा मागे घ्यावा, यासाठी फिर्यादीचा पाठलाग करुन तिला हातवारे करुन मानसिक त्रास दिल्याचा प्रकार समोर आला आहे. जुलै २०२१ मध्ये हा प्रकार घडला होता.

याप्रकरणी महिलेच्या फिर्यादीवरुन कोंढवा पोलिसांनी ४० वर्षाच्या तरुणावर गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी सांगितले की, फिर्यादी आणि आरोपी हे लुल्लानगरमधील एकाच सोसायटीत राहतात. फिर्यादी यांनी सोसायटीच्या चेअरमन यांच्याविरुद्ध विनयभंगाची तक्रार दिली होती. त्यावरुन कोंढवा पोलिसांनी यापूर्वी त्यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. जुलै २०२१ मध्ये हा प्रकार घडला होता. त्यानंतर याच सोसायटीमध्ये राहणारा आरोपी याने चेअरमन यांच्या सांगण्यावरुन फिर्यादी यांच्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न केला. फिर्यादी यांचा सतत पाठलाग करुन ‘‘चेअरमनने तुम्हारे साथ जैसे किया वैसाही मै भी करुंगा और तुमको हम सब पागल करके ही छोडेंगे’’ असे वारंवार बोलत होता. फिर्यादी यांच्या बिल्डींगच्या खाली उभा राहून फिर्यादीकडे बघून हातवारे करुन ‘‘मी वर येऊन तुला बघून घेतो, तुला मारुन टाकतो,’’ असे इशारे करुन फिर्यादी यांना मानसिक त्रास देत होता. ६ जुलैपासून त्याचा हा प्रकार सुरु होता. शेवटी फिर्यादी यांनी पोलिसांकडे धाव घेऊन फिर्याद दिली असून, पोलीस उपनिरीक्षक जाधव अधिक तपास करीत आहेत.

get_footer();