आवृत्ती पुणे
← Back to Homepage

अवैध धंद्यावर छापा टाकून ७६ हजारांचा मुद्देमाल जप्त

maharashtra jain warta • News Slider, Police, Previous Issue • December 22, 2021

४० जणांना घेतले ताब्यात : बंडगार्डन पोलीस स्टेशन हद्दीमध्ये कारवाई

महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क

पुणे : अवैध धंद्यावर युनिट-३ व ४ आणि अंमली पदार्थविरोधी पथक-१च्या अधिकाऱ्यांनी बंडगार्डन पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये छापा टाकून विवेक विनायक निकाळजे (वय ४५, रा. सुभाषनगर, नवी खडकी, येरवडा) याच्यासह सोरट, मटका व जुगार घेणारे व खेळणाऱ्या ४० जणांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून ७६ हजार ७९० रुपये व जुगाराचे साहित्य जप्त केले. त्यांच्यावर बंडगार्डन पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, पोलीस सहआयुक्त डॉ. रवींद्र शिसवे, अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, पोलीस उपायुक्त श्रीनिवास घाडगे, सहायक पोलीस आयुक्त गजानन टोम्पे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट-३चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अभय महाजन, विनायक गायकवाड, सहायक पोलीस निरीक्षक ढेगळे, पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय काळे, जयदीप पाटील, पोलीस अंमलदार महेश निंबाळकर, संतोष क्षीरसागर, राजेंद्र मारणे, विल्सन डिसोझा, सुजीत पवार, संजीव कळंबे, ज्ञानेश्वर चित्ते, प्रकाश कट्टे, दीपक क्षीरसागर, राकेश टेकावडे यांच्या पथकाने ही कामगिरी केली.

get_footer();