आवृत्ती पुणे
← Back to Homepage

अवैध वाळू उपसा करणाऱ्याला ठोकल्या बेड्या

maharashtra jain warta • News Slider, Police, Previous Issue • April 13, 2022

सोलापूर ग्रामीण पोलिसांची कारवाई : नऊ लाख 71 हजार रुपयांचा मुद्देमाल केला जप्त

महाराष्ट्र 360 न्यूज नेटवर्क

पुणे : सोलापूर ग्रामीण पोलिसांनी गोपाळपूर (ता. पंढरपूर, जि.सोलापूर) येथे अवैध वाळू उपसा करणाऱ्या एकाला अटक करून चौघांवर गुन्हा दाखल केला आहे. आरोपीकडून 20 ब्रास वाळू, दोन वाहने असा एकूण 9 लाख 71 हजार 200 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.

सागर ज्योतिबा कोळी (वय 22, रा. गोपाळपूर, ता. पंढरपूर, जि. सोलापूर) याला अटक केली असून, चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सोलापूर ग्रामीणचे पोलीस उपनिरीक्षक शैलेश खेडकर तपास पथकासह गोपाळपूर परिसरात पेट्रोलिंग करीत होते. त्यावेळी भीमा नदी पात्रातून बबलू आसबे यांच्या शेतालगत दोन वाहनातून वाळू चोरून नेत असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली. त्यानुसार पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत एक महिंद्र पिकअप व एक टाटा योद्धा अशी दोन वाहने ताब्यात घेतली. त्यामध्ये 20 ब्रास वाळू, दोन वाहने असा एकूण 9 लाख 71 हजार 200 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करून चौघांवर पंढरपूर तालुका पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सोलापूर ग्रामीणच्या पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते, अपर पोलीस अधीक्षक हिंमत जाधव, गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुहास जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक शैलेश खेडकर, सहायक पोलीस उपनिरीक्षक बिराजी पारेकर, पोलीस हवालदार सर्जेराव बोबडे यांच्या पथकाने ही कारवाई केली.

get_footer();