आवृत्ती पुणे
← Back to Homepage

अनैतिक संबंधातून महिलेचा खून करणाऱ्याला बिहारमधून अटक

maharashtra jain warta • News Slider, Police, Previous Issue • February 17, 2022

विमानतळ पोलिसांची कामगिरी : मृतदेह बाथरुममध्ये टाकून झाला होता फरार

महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क

पुणे : अनैतिक संबंधातून महिलेचा खून करून पळून गेलेल्या आरोपीला बिहारमधून विमानतळ पोलिसांनी जेरबंद केले. ही घटना विमानतळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत 6 फेब्रुवारी रोजी उघडकीस आली होती. महिलेचा खून केल्यानंतर आरोपीने मृतदेह घरातील बाथरुममध्ये टाकून फरार झाला होता.

गुलाब मोहम्मद मुख्तार शेख (वय-32 रा. पठारे वस्ती, संत नगर लोहगाव, मूळ रा. बिहार) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी मयत महिलेच्या पतीने विमानतळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

मोझे आळी परिसरातील आरोपी गुलाब हा मयत महिलेच्या घरामध्ये भाड्याने राहत होता. दरम्यानच्या काळात त्यांच्यामध्ये प्रेमसंबंध निर्माण झाले. ही बाब मयत महिलेच्या कुटुंबीयांना समजल्यानंतर त्यांनी आरोपीला घर खाली करण्यास सांगितले. घटनेच्या दिवशी दुपारी महिला घरामध्ये एकटी असताना आरोपी गुलाब हा घरी आला. त्यावेळी महिलेने अनैतिक संबंधास नकार दिल्याने त्याने तिचा बाथरुमध्ये गळा आवळून खून करुन फरार झाला असे फिर्यादीत नमूद केले आहे.

मोबाईल नंबरच्या तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे आरोपीचा तपास करत असताना तपास अधिकारी पोलीस निरीक्षक गुन्हे मंगेश जगताप यांना आरोपी त्याच्या मुळ गावी बिहार येथे रेल्वेने पळुन जात असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांचे एक पथक बिहार येथे रवाना करण्यात आले. विशेष पथक व स्थानिक पोलीस यांनी आरोपीच्या घराभोवती सापळा रचला. पोलीस आल्याचे समजात आरोपी तेथून पळून जाऊ लागला. पोलिसांनी आरोपीचा सिनेस्टाईल पाठलाग करुन आरोपीला ताब्यात घेतले.

पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, पोलीस सह आयुक्त डॉ. रविंद्र शिसवे, अपर पोलीस आयुक्त पुर्व प्रादेशीक विभाग नामदेव चव्हाण, पोलीस उपायुक्त रोहिदास पवार, सहायक पोलीस आयुक्त किशोर जाधव, वरिष्ठ पोलीस निरीक्षक भरत जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक गुन्हे मंगेश जगताप, सहायक पोलीस निरीक्षक मिलिंद पाठक, पोलीस उपनिरीक्षक एस.ए. जाधव, पोलीस अंमलदार रमेश लोहकरे, किरण खुडे, उमेश धेंडे, विनोद महाजन, किरण अब्दागिरे, रिहान पठाण, नाना कर्चे, रुपेश तोडेकर यांच्या पथकाने ही कामगिरी केली.

get_footer();