आवृत्ती पुणे
← Back to Homepage

परिमंडल-३ अंतर्गत पोलीस स्टेशनच्या बालस्नेही कक्षाचे लोकार्पण

maharashtra jain warta • News Slider, Police, Previous Issue • November 21, 2021

पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्या हस्ते बालहक्क दिनी बालस्नेही कक्ष सुरू

महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क

पुणे : जागतिक बालहक्क दिनाचे औचित्य साधून शहर पोलीस आयुक्तालयांतर्गत परिमंडल-३ मधील बाल स्नेही पोलीस कक्ष सुरू करण्यात आले. यावेळी सिंहगड रोड, दत्तवाडी, अलंकार, कोथरूड, वारजे-माळवाडी व उत्तमनगर पोलीस स्टेशनमधील बाल स्नेही कक्षाचे प्रतिकात्मक पद्धतीने पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले.

याप्रसंगी होप फॉर द चिल्ड्रन फाउंडेशनच्या संस्थापक मुख्याधिकारी कॅरोलिन वॉल्टर, पोलीस सायकालॉजी वेल बिइग ग्रुपच्या सदस्या गायत्री कोटबागी, अभिनेत्री पर्ण पेठे, लायन्स क्लब ऑफ पुणेचे अभय जोशी, राष्ट्रीय बाल आयोगाच्या माजी सदस्या रुपा कपूर, जिल्हा बाल संरक्षण विभागाचे सभासद परमानंद आदी उपस्थित होते. या कार्यक्रमात ३०-४० बालगोपाळांनी आनंद लुटला. यावेळी महेंद्र वाळुंज यांनी बालगीत सादर करून कार्यक्रमाची शोभा वाढविली.

पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता म्हणाले की, बाल न्याय अधिनियम २०१५च्या प्रस्तावनेत नमूद केल्यानुसार बालकांसोबत काम करणाऱ्या सर्वच यंत्रणा बालस्नेही असणे आवश्यक आहे. या बाबींची काटेकोरपणे अंलबजावणी व्हावी, पोलीस स्टेशनच्या कार्यक्षेत्रातील संरक्षणाची गरज आणि विधिसंघर्षग्रस्त अशी सर्व बालकांचे पुनर्वसन बालस्नेही वातावरणात करावे, याकरिता पोलीस स्टेशन परिसरात बालस्नेही कक्षाची निर्मिती करण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, पोलीस सहआयुक्त डॉ. रविंद्र शिसवे यांच्या मार्गदर्शनाखाली अपर पोलीस आयुक्त राजेंद्र डहाळे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपायुक्त पौर्णिमा गायकवाड, सहायक पोलीस आयुक्त गजानन टोम्पे, सहायक पोलीस आयुक्त सुनील पवार, देविदास घेवारे, प्रतिभा जोशी, महेंद्र जगताप, कृष्ण इंदलकर, शंकर ठके, सुनील जैतापूरकर यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विशेष प्रयत्न केले.

get_footer();