आवृत्ती पुणे
← Back to Homepage

झटपट श्रीमंत होण्याच्या नादात अडकला पोलिसांच्या जाळ्यात

maharashtra jain warta • News Slider, Police, Previous Issue • October 4, 2021

गुन्हे शाखेच्या युनिट-२ची कारवाई : सव्वा लाख रुपयांचा मुद्देमाल केला जप्त

महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क

पुणे : झटपट श्रीमंत होण्यासाठी पुणे शहरात दुचाकी चोरी करणाऱ्या सराईत गुन्हेगाराला गुन्हे शाखेच्या युनिट-२च्या पथकाने बेड्या ठोकल्या. आरोपीवर पुणे आणि परिसरात दुचाकी चोरीचे गुन्हे दाखल आहेत. गुन्हे शाखेने अटक केलेल्या आरोपीकडून चार वाहनचोरीचे गुन्हे उघडकीस आले असून सव्वा लाखाचा मुद्देमाल जप्त केला आहे.

चंद्रकांत विष्णू वाघमारे (वय-27 रा. अंत्रोली, ता. वेल्हे) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. गुन्हे शाखा युनिट दोनच्या पथकाने ही कारवाई मालधक्का चौकात केली आहे. आरोपीने शिरवळ, हवेली, सिंहगड पोलीस ठाण्याच्या हद्दीतून दुचाकी चोरल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.

पोलिसांनी सांगितले की, मालधक्का चौकात एकजण चोरीची दुचाकी घेऊन उभा असल्याची माहिती पोलीस हवालदार नामदेव रेणुसे यांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून चंद्रकांत वाघमारे याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे सखोल चौकशी केली असता त्याच्या ताब्यात असलेली दुचाकी साधू वासवानी चौकातून चोरल्याची कबुली दिली. त्याच्याकडून शिरवळ, हवेली, सिंहगड पोलीस ठाण्याच्या हद्दीतून चोरलेल्या दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत.

पोलीस निरीक्षक क्रांतीकुमार पाटील, सहायक पोलीस निरीक्षक प्रकाश मोरे, पोलीस उपनिरीक्षक वैशाली भोसले, यशवंत आंब्रे, नामदेव रेणुसे, गजानन सोनुने, चेतन गोरे, निखील जाधव यांच्या पथकाने केली.

get_footer();