आवृत्ती पुणे
← Back to Homepage

जगाच्या स्पर्धेत टिकण्यासाठी गुणवत्ता महत्त्वाची- तुषार कदम

maharashtra jain warta • News Slider, Previous Issue, Social • January 14, 2022

महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क

पुणे : विद्यार्थ्यांमधील सुप्त कलागुणांना वाव मिळाला पाहिजे, त्यासाठी त्यांना परीक्षेच्या माध्यमातून प्रोत्साहन देण्याची गरज आहे. जगाच्या स्पर्धेत टिकायचे असेल तर गुणवत्ता वाढीसाठी नवनवे उपक्रम राबविण्याची गरज आहे, असे मत जनसेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष तुषार कदम यांनी व्यक्त केले.

ऑर्चिड स्कूल आणि जनसेवा प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने श्रीनिवास संकुल सोसायटीमधील विद्यार्थ्यांसाठी स्कॉलरशिप परीक्षेचे आयोजन केले होते. याप्रसंगी सोसायटीचे चेअरमन मंगेश भगत, किरण पाटील घोरतळे, राहुल कोकरे, आशिष अंदाडे, सुजय निंबाळकर, दिपक खैरे, श्रीनिवास संकुलमधील महिला सभासद, ऑर्चिड स्कूलचे शिक्षक आणि जनसेवा प्रतिष्ठान सभासद उपस्थित होते.

कदम म्हणाले की, स्पर्धा परीक्षेसाठी सोसायटीतील विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. छोटा आणि मोठा अशा दोन गटामध्ये परीक्षा घेण्यात आली. मोठ्या गटामध्ये प्रथम क्रमांकास दहा हजार रुपये शैक्षणिक शिष्यवृत्ती ऑर्चिड स्कूलकडून देण्यात येणार आहे. तसेच जनसेवा प्रतिष्ठान कडून विद्यार्थ्यांना शैक्षणिक भेटवस्तू आणि प्रमाणपत्र देण्यात आले.

get_footer();