आवृत्ती पुणे
← Back to Homepage

जन्मदात्या आईला मुलांकडून लाथा-बुक्क्यांनी केली मारहाण

maharashtra jain warta • News Slider, Police, Previous Issue • August 24, 2021

पुण्यात मायलेकरांच्या नात्याला काळिमा फासणारी घटना

महाराष्ट्र ३६० न्यूज

पुणे : पुण्यात मायलेकराच्या नात्याला काळिमा फासणारी हृदय हेलावून टाकणारी घटना घडली. दोन नराधम मुलांनी वयोवृद्ध आईच्या नावावरील संपत्ती हडप करण्यासाठी जन्मदात्या आईचा अमानुष छळ केला आहे. त्या नराधम दोन तरुणांनी आपल्या आईला लाथा बुक्क्यांनी मारहाण करत तिला घराबाहेर काढलं आहे. याप्रकरणी पीडित आईने बंडगार्डन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार दोघांवर घरगुती हिंसाचारासह हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा पोलिसांनी दाखल केला आहे.

पोलिसांनी सांगितले की, मुन्नवर अब्बास अली नईमाबादी (वय, 57) असे पीडित महिलेचं नाव आहे. त्या गृहिणी असून पुण्यातील सिनेगाँग रोड परिसरातील गीता हाऊसिंग सोसायटीत राहतात. अहेमद अब्बास अली नईमाबादी (वय, 39) आणि हुसेन अब्बास अली नईमाबादी (वय, 32) अशी नराधम मुलांची नावे आहेत. या प्रकरणावरून पोलिसांनी पीडित महिलेची नणंद आणि दीर यांच्यावरदेखील गुन्हा दाखल केला आहे.

आरोपी दोन्ही मुलांनी पीडित महिलेच्या नावावर असणारं घर बळकवण्यासाठी गेल्या काही काळापासून तिचा मानसिक आणि शारीरिक छळ केला आहे. आरोपींनी संपत्तीमधील आईचा हिस्सा काढून घेण्यासाठी हा छळ केला आहे. संपत्तीच्या हव्यासापोटी आरोपीनं आपल्या आईचाच छळ केला आहे. तसेच कोऱ्या स्टॅम्प पेपरवर आईनं सह्या कराव्यात, फ्लॅट नावावर करून द्यावा, यासाठी पीडितेच्या मुलांनी आणि अन्य नईमाबादी कुटुंबीयांनी तिला बेदम मारहाण केलीय. दरम्यान, पीडित महिलेनं
कोऱ्या स्टॅप पेपरवर स्वाक्षरी करायला नकार दिल्यानं आरोपी मुलानं आईला खुर्ची फेकून मारली आहे.

दरम्यान, नराधम मुलाच्या हल्ल्यानंतर पीडित महिला खाली कोसळल्यानंतर घरातील इतर कुटुंबीयांनी त्यांना लाथा-बुक्क्यांनी मारहाण केलीय. या हल्ल्यामध्ये ती जखमी झालीय. याच अवस्थेत त्या नाना पेठेतील आपल्या भावाच्या घरी आल्या आहेत. दरम्यान आरोपी मुलाने पीडित महिलेचं घर बळकावलं आहे. याप्रकरणी पीडितेने बंडगार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. याबाबत अधिक तपास पोलीस करत आहेत.

get_footer();