आवृत्ती पुणे
← Back to Homepage

जाणिव फाउंडेशनने निराधारांना दिले उबदार कपडे

maharashtra jain warta • News Slider, Police, Previous Issue • January 17, 2022

शहर परिसरात थंडीने काकडणाऱ्या पदपथ, रस्त्यावरील गरजूंना मिळाली मायेची उब

महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क

पुणे : मागिल काही दिवसांपासून कडाक्याची थंडी पडल्याने प्रत्येकजण स्वतःची काळजी घेत आहे. मात्र, शहर परिसरातील रस्ता, पदपथ आणि उघड्यावरील निराधारांना जाणिव फाउंडेशनच्या वतीने स्वेटर, जॅकेट, ब्लँकेट देत मायेची उब दिली. कडाक्याच्या थंडीपासून निराधारांना काही अंशी मदतीचा हात पुढे केल्याची भावना कार्यकर्त्यांनी व्यक्त केली.

जाणिव फाऊंडेशनच्या वतीने संदीप काळे व किरण साबळे यांच्या सहकाऱ्यांनी शहरातील निराधारांना उबदार कपडे देण्याचा उपक्रम हाती घेतला आहे. मागिल चार दिवसांपासून कार्यकर्ते दोन कार भरून स्वेटर, जॅकेट देण्याचे काम करीत आहेत. जाणिवचे कार्यकर्ते निस्वार्थी भावनेने व स्वखर्चाने हा उपक्रम राबवत आहेत, असे फाऊंडेशनचे अध्यक्ष अमोल काटे यांनी सांगितले. या उपक्रमामध्ये गोपाळ कांबळे, विकी शिंदे, विरू जगताप, भाऊसाहेब आव्हाड, प्रसाद, वैभव वांद्रे, अविनाश पाटील यांनी मोलाचे योगदान दिल्याचे त्यांनी सांगितले.

get_footer();