आवृत्ती पुणे
← Back to Homepage

जीव देण्याची धमकी देत लैंगिक अत्याचार करणारा जेरबंद

maharashtra jain warta • News Slider, Police, Previous Issue • November 23, 2021

चंदननगर पोलिसांची कामगिरी : पोस्कोअंतर्गत गुन्हा दाखल

महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क

पुणे : १३ वर्षाच्या अल्पवयीन मुलीला पळवून नेऊन तिला लग्नाचे आमिष दाखविले. जीव देण्याची धमकी देऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा प्रकार समोर आला आहे.

याप्रकरणी वडगाव शेरी येथील एका महिलेने चंदननगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी मल्लेश विठ्ठल कांबळे (वय १९, रा. थिटे वस्ती, खराडी) याला अटक केली आहे. फिर्यादी यांची १३ वर्षाची अल्पवयीन मुलगी घरी परत न आल्याने तिला कोणीतरी कशाचे तरी आमिष दाखवून पळवून नेल्याची तक्रार २१ नोव्हेबर रोजी मध्यरात्री साडेबार वाजता दिली होती. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. तपासादरम्यान तिच्या ओळखीच्या कांबळे याने तिला पळवून नेले. वडगाव शेरी येथील मोकळ्या रुममध्ये तिला तो घेऊन गेला. तिला आपण लग्न करु, असे आमिष दाखविले. तू माझ्यावर प्रेम केले नाही तर मी जीव देईन अशी धमकी देऊन तिच्या इच्छेविरुद्ध शारीरीक संबंध केले.

पोलिसांनी पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करुन कांबळे याला अटक केली आहे. पोलीस उपनिरीक्षक मिसाळ तपास करीत आहेत.

get_footer();