आवृत्ती पुणे
← Back to Homepage

ज्वेलर्सच्या दुकानातून चोरी करणारे वैद्यकीय क्षेत्रातील दोघे जेरबंद

maharashtra jain warta • News Slider, Police, Previous Issue • December 15, 2021

हडपसर पोलिसांची प्रशंसनीय कामगिरी : अडीच लाखांचा मुद्देमाल जप्त

महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क

पुणे : मैत्रिणीला गिफ्ट आणि चैन करण्यासाठी सोन्याच्या अंगठ्या चोरणाऱ्या वैद्यकीय क्षेत्रात शिक्षण घेणाऱ्या दोघांना हडपसर पोलिसांनी बेड्या ठोकल्या. आरोपींकडून अडीच लाख रुपयांच्या सोन्याच्या अंगठ्यासह दुचाकी जप्त केली.

अनिकेत हनुमंत रोकडे (वय २१, रा. राधाकुंज निवास, महात्मा गांधी कॉलेजजवळ, नागोबानगर, अहमदपूर, लातुर) आणि वैभव संजय जगताप (वय २२, रा. मु. पो. कैवाड केनवड, ता. रिसोड, जि. वाशिम) अशी अटक केलेल्या दोघांची नावे आहेत.

पोलिसांनी सांगितले की, हडपसरमधील रांका ज्वेलर्समधून ८ डिसेंबर २०२१ रोजी दुपारी पावणेतीनच्या सुमारास मास्क लावून दोन तरुण आले, त्यांनी सोने खरेदी करण्याच्या बहाण्याने अंगठ्या दाखविण्यास सांगितले. दरम्यान, एकजण दुकानातून बाहेर गेला आणि दुचाकी चालू करून थांबला होता. याचवेळी सेल्समन सोन्याचा ट्रे ठेवत असताना हातचलाखीने तीन अंगठ्या घेऊन बाहेर पळाला आणि दुचाकीवर बसून पळून गेले. याअगोदर या तरुणांनी कोथरूडमधील ब्ल्यू स्टोन ज्वेलर्समधून अशाच पद्धतीने अंगठी चोरून गेल्याचा अलंकार पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता. हडपसर पोलीस स्टेशनच्या तपास पथकाने सी.सी.टी.व्ही. आणि सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार दोन संशयितांना ताब्यात घेऊन तपास केला. त्यावेळी दोन्ही आरोपी व्यसनी असून, मैत्रिणींना गिफ्ट आणि चैन करण्यासाठी चोरी केल्याची कबुली दिली. दोघेही पुण्यातील नामांकित महाविद्यालयामध्ये बी.ए.एम.एस. व बी.एस.सी. नर्सिंगचे तृतीय वर्षाचे शिक्षण घेत आहेत. आरोपींकडून दोन लाख ५० हजार रुपये किमतीच्या ३६ ग्रॅम ७७० मिली ग्रॅम वजनाच्या चार सोन्याच्या अंगठ्यासह दुचाकी हस्तगत केली आहे. पुढील तपास हडपसर पोलीस करीत आहेत.

अप्पर पोलीस आयुक्त नामदेव चव्हाण, पोलीस उपायुक्त नम्रता पाटील यांच्या मागदर्शनाखाली सहायक पोलीस आयुक्त बजरंग देसाई, हडपसर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद गोकुळे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) राजू अडागळे, दिगबंर शिंदे यांच्या सुचनांप्रमाणे तपास पथकाचे सहायक पोलीस निरीक्षक हनुमंत गायकवाड, पोलीस उपनिरीक्षक सौरभ माने, पोलीस अंमलदार, प्रदीप सोनवणे, गणेश क्षीरसागर, अविनाश गोसावी, संदीप राठोड, समीर पांडुळे, शशिकांत नाळे, सचिन जाधव, शाहीद शेख, प्रशांत दुधाळ, निखील पवार, प्रशांत टोणपे, रियाज शेख, सचिन गोरखे, सूरज कुंभार यांच्या पथकाने ही प्रशंसनीय कामगिरी केली.

वैद्यकीय क्षेत्राला काळीमा फासणारी घटना…

कोरोना महामारीमध्ये वैद्यकीय क्षेत्राची महत्त्वाची भूमिका ठरली. मात्र, मैत्रिणीला गिफ्ट आणि चैनबाजी करण्यासाठी सोन्याच्या दुकानातून अंगठ्या चोरून वैद्यकीय क्षेत्रातील तरुणांनी वैद्यकीय क्षेत्राला काळीमा फासला आहे.

get_footer();