आवृत्ती पुणे
← Back to Homepage

नोकरी गेल्यामुळे मंदिरात जाऊन दर्शन घेतल्यानंतर संपवले जीवन

maharashtra jain warta • News Slider, Police, Previous Issue • October 5, 2021

दत्तवाडी परिसरातील घटना : मध्य प्रदेशातील तरुणाने उचलले टोकाचे पाऊल

महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क

पुणे – मध्यप्रदेशातील तरुणाने नोकरी गेल्यामुळे आलेल्या नैराश्यातून साने गुरूजी वसाहत येथील दत्त मंदिरात जाऊन दर्शन घेतल्यानंतर स्वतःवर चाकूने वार करून घेतल्याचा धक्कादायक प्रकार गुरूवारी रात्री घडला. या तरुणाचा शुक्रवारी सकाळी उपचारा दरम्यान मृत्यू झाला.

राजेंद्र रमेश महाजन (वय २२, रा. पुणे, मुळ. बुर्‍हाणपूर, मध्यप्रदेश) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे.

पोलिसांनी सांगितले की, राजेंद्र हा गुरूवारी रात्री साडे आठ ते नऊ वाजण्याच्या सुमारास दत्तवाडी परिसरातील साने गुरूजी वसाहत परिसरातील साईबाबांच्या मंदिरात आला. मंदिरात आल्यानंतर साई बाबांच्यासमोर नतमस्तक होत आणलेला हार अर्पण केला. त्यानंतर बाहेर येऊन खिशात आणलेला चाकू पोटात खुपसून घेतला. तो रक्ताच्या थारोळ्यात पडला. तरुण मंदिरात रक्ताच्या थारोळ्यात पडल्याची माहिती दत्तवाडी पोलिसांना मिळाली. त्यानंतर दत्तवाडी पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. त्याला तत्काळ रुग्णालयात भरती केले. मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाल्यामुळे उपचारादरम्यान राजेंद्रचा सकाळी मृत्यू झाला. राजेंद्र जवळ असलेल्या मोबाईलवरून पोलिसांनी घटनेची माहिती नातेवाईकांना दिली. मुलाची वाट पहात असलेल्या नातेवाईकांना या घटनेनंतर धक्काच बसला. मध्य प्रदेशातून त्याचे नातेवाईक पुण्यात आले.

शवविच्छेदन केल्यानंतर त्याचा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला. याप्रकरणी दत्तवाडी पोलिस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आल्याचे पोलिस निरीक्षक (गुन्हे) विजय खोमणे यांनी सांगितले.

get_footer();