आवृत्ती पुणे
← Back to Homepage

जुन्या भांडणाच्या रागातून जीवे मारण्याचा प्रयत्न करणारा जेरबंद

maharashtra jain warta • News Slider, Police, Previous Issue • November 3, 2021

ताडीवाला रोड येथील प्रकार : बंडगार्डन पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल

महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क

पुणे : जुन्या भांडणाच्या रागातून घरात घुसून शिवीगाळ करीत जीवे मारण्याचा प्रयत्न करणाऱ्यास बंडगार्डन पोलिसांनी अटक केली. ही घटना प्रायव्हेट रोड, ताडीवाला रोड येथे १ नोव्हेंबर २०२१ रोजी दुपारी अडीचच्या सुमारास घडली.

दाऊद गुडूसाब नदाफ (वय ३२, रा. इंदिरा विकास रोड, ताडीवाला रोड, पुणे असे अटक केलेल्याचे नाव आहे. याप्रकरणी २० वर्षीय महिलेने बंडगार्डन पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली असून, त्यानुसार गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी सांगितले की, दाऊद गुडूसाब नदाफ याने जुन्या भांडणाचा राग मनात धरून फिर्यादीच्या घरात जाऊन शिवीगाळ करत हाता-पायावर व पोटात लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. फिर्यादीचा गळा आवळून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. बंडगार्डन पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक माने पुढील तपास करीत आहेत.

get_footer();