आवृत्ती पुणे
← Back to Homepage

कल्याणीनगरमधील सहा लोखंडी पावसाळी चेंबरची चोरी

maharashtra jain warta • News Slider, Police, Previous Issue • August 31, 2021

येरवडा पोलीस स्टेशनमध्ये अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल

पुणे : महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क

नगररोड वडगावशेरी क्षेत्रीय कार्यालयांतर्गत कल्याणीनगरमधील सहा लोखंडी पावसाळी चेंबर अज्ञाताने चोरून नेली. पालिका अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी पाहणी केली. या प्रकरणी येरवडा पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली आहे. कल्याणीनगरमधील पुष्पक सोसायटीच्या लेनमध्ये २० ऑगस्ट २०२१ रोजी उघडकीस आला.

वैभव कांबळे (वय ३४, रा. येरवडा, पुणे) यांनी याप्रकरणी फिर्याद दिली असून, त्यानुसार अज्ञातावर गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी सांगितले की, महापालिकेच्या वडगावशेरी क्षेत्रीय कार्यालयांतर्गत प्रभाग क्र.५मधील गलांडे उद्यान, गेटसमोर कल्याणीनगर ते फ्लोवर वर्कस हॉटेल दरम्यान तीन लोखंडी पावसाळी चेंबर, ममता जनरल स्टोअर्ससमोर कल्याणीनगर येते एक लोखंडी पावसाळी चेंबर आणि पुष्पक सोसायटीच्या लेनमध्ये दोन लोखंडी चेंबर बसविले होते. येथील लोखंडी चेंबरची २० ऑगस्ट २०२१ रोजी अज्ञाताने चोरून नेल्याबाबतची तक्रार आल्यानंतर पालिका अधिकारी आणि फिर्यादींनी पाहणी केली. त्यावेळी अज्ञात चोरट्याने चेंबर चोरून नेल्याचे निदर्शनास आले. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक व्ही. एन. पाटील करीत आहेत.

get_footer();