आवृत्ती पुणे
← Back to Homepage

कर्नाटकातून येणाऱ्या टेम्पोचालकासह साथीदार जेरबंद

maharashtra jain warta • News Slider, Police, Previous Issue • February 11, 2022

सोलापूर ग्रामीण पोलिसांची कामगिरी : ४८ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त

महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क

सोलापूर : कर्नाटकातून मंद्रुप पोलीस स्टेशनमध्ये गुटख्याचा टेम्पो पकडून ४८ लाख १६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करून टेम्पोचालक व त्याच्या साथीदाराला अटक केली. सोलापूर ग्रामीणच्या स्थानिक गुन्हे शाखेने ही कारवाई केली.

अब्दुल रेहमान अब्दुल हमीद (वय ३५, रा. चिंचगुंडी, ता. शिकारीपुरा, जि. शिमोगा, जबीउल्ला सैद साहब कोडद-पाटील (वय ४३, रा. येलवाड, ता. हिरेकेरुर, जि. आवेरी) अशी अटक केलेल्या दोघांची नावे आहेत.

कर्नाटकातून ८ फेब्रुवारी २०२२ रोजी रात्री दहाच्या सुमारास नांदणी शिवारामध्ये भागवत पेट्रोल पंपाजवळ संशयित वाहन आढळून आले. त्याची तपासणी केली असता, त्यामध्ये पानमसाला २४० पोती, रोयाल ७१७, सुगंधीत जर्दा २४० पोते व टेम्पो असा एकूण ४८ लाख १६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करून ट्रकचालक व त्याच्या एका साथीदाराला ताब्यात घेऊन अटक केली. त्यांच्यावर मंद्रुप पोलीस स्टेशनमध्ये अन्न व सुरक्षा कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

सोलापूर ग्रामीणच्या पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते, अपर पोलीस अधीक्षक हिंमत जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सर्जेराव पाटील यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक अमित सिद-पाटील, सहायक फौजदार शिवाजी घोळवे, सहायक फौजदार निलकंठ जाधवर, पोलीस हवालदार संदीप काशीद, प्रकाश कारटकर यांच्या पथकाने ही कामगिरी केली.

get_footer();