आवृत्ती पुणे
← Back to Homepage

कात्रज-नवले ब्रीज दरम्यानच्या रस्त्यावर अपघातात एकाचा मृत्यू

maharashtra jain warta • News Slider, Police, Previous Issue • September 8, 2021

भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल

महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क

पुणे : कात्रज-नवले ब्रीज दरम्यानच्या रस्त्यावर अज्ञात वाहनाचा अपघात झाला. या अपघातात एकाचा मृत्यू झाला. अपघातानंतर वाहनचालक पळून गेला. ही घटना ६ सप्टेंबर २०२१ रोजी साडेनऊ ते सव्वादहाच्या सुमारास घडली.

तुलसीराम ग्यानबा खोमणे (वय ४२, रा. सच्चाईमातानगर, आंबेगाव खुर्द, पुणे) असे अपघातात मृत्यूमुखी पडलेल्याचे नाव आहे.
भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनमधील पोलीस अंमलदार अजित कोकरे यांनी फिर्याद दिली असून, त्यानुसार गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी सांगितले की, कात्रजकडून नवले ब्रिजकडे जाणाऱ्या रस्त्यावर ६ सप्टेंबर २०२१ रोजी रात्री साडेनऊ ते सव्वादहाच्या सुमारास अपघात झाला. या अपघातामध्ये एका वाहनचालकाचा मृत्यू झाला. अपघातानंतर वाहनचालक घटनास्थळी न थांबता पळून गेला.
भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस फौजदार एस. एस. देशमुख पुढील तपास करीत आहेत.

get_footer();