आवृत्ती पुणे
← Back to Homepage

खडक पोलीस ठाण्याच्या हद्दीत चोरट्याकडून गोळीबार

maharashtra jain warta • News Slider, Police, Previous Issue • September 2, 2021

स्थानिकांनी चोरट्यास पकडून बेदम चोपले

पुणे : महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क

खडक माळ आळीमद्ये चोरट्याने हवेत गोळीबार केल्यामुळे खळबळ उडाली. ही घटना गुरुवारी दुपारी दोनच्या सुमारास खडक पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली. स्थानिक नागरिकांनी या चोरट्याला पकडून बेदम चोप देत पोलिसांच्या स्वाधीन केले आहे.

पोलिसांनी सांगितले की, खडकमाळ आळी येथे 45 वर्षांचा चोरटा चोरीच्या उद्देशाने आला होता. खडक माळ आळीमध्ये असलेल्या चर्चजवळ असलेल्या एका केक शॉपमध्ये चोरी करण्यासाठी गेला. चोरी करीत असताना स्थानिक नागरिकांनी त्याला पकडले. त्यावेळी चोरट्याने त्याच्याकडील बंदुकीमधून हवेत गोळी झाडली. या घटनेत कोणीही जखमी झालेले नाही. मात्र, स्थानिक नागरिकांनी त्याला चोप देत पोलिसांच्या स्वाधीन केले आहे.

दरम्यान, घटनेची माहिती मिळताच खडक पोलिस ठाण्याचे पोलिस अधिकारी आणि कर्मचारी तसेच गुन्हे शाखेचे पोलिस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. या चोरट्यावर अनेक गुन्हे दाखल असून काही गुन्ह्यांमध्ये तो फरार असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. या सोबतच तो येरवडा कारागृहातून फरार असल्याचेदेखील समोर येत आहे. त्या अनुषंगाने पोलिस तपास करीत असल्याचे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.

get_footer();