आवृत्ती पुणे
← Back to Homepage

खुनाच्या गुन्ह्यातील फरार आरोपी ३ वर्षांनंतर जेरबंद

maharashtra jain warta • News Slider, Police, Previous Issue • October 3, 2021

गुन्हे शाखा युनिट सहाची कामगिरी : परळी वैजनाथ येथील खूनप्रकरण

महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क

पुणे : परळी वैजनाथ येथील खुनाच्या गुन्ह्यातील फरार आरोपीस तीन वर्षांनंतर जेरबंद करण्यात गुन्हे शाखा युनिट सहाला यश मिळाले असून, सदर आरोपीस संभाजीनगर पोलीस स्टेशन, जि. बीड यांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

शुक्रवारी १ ऑक्टोबर रोजी गुन्हे शाखा युनिट सहाचे पथक हद्दीमध्ये गस्त करीत असताना पोलीस नाईक नितीन मुंढे यांना त्यांच्या बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, परळी वैजनाथ (जि. बीड) येथील खुनाच्या गुन्ह्यातील फरार आरोपी सुदीप उर्फ पापा सोनवणे हा खराडी बायपास चौक, नगर रोड, पुणे येथे येणार आहे. याबाबत पोलीस निरीक्षक गणेश माने यांना कळविले असता त्यांनी सदर माहितीची खातरजमा करून माहितीप्रमाणे नमुद ठिकाणी कारवाई करून आरोपीला ताब्यात घेऊन त्याच्यावर कार्यवाही करण्याचे आदेश दिल्याने सहपोलीस निरीक्षक पाटील यांनी स्टाफच्या मदतीने सापळा रचून सुदीप उर्फ पापा सोनवणे (वय २४, रा. माळवाडी, हडपसर, पुणे, मूळ रा. सिद्धार्थनगर, परळी वैजनाथ, जि. बीड) यास ताब्यात घेतले.

गुन्ह्याच्या अनुषंगाने त्याच्याकडे तपास केला असता, त्याने त्याच्या इतर साथीदारांसह परळी वैजनाथ येथील एका इसमाचा मे २०१८ मध्ये खून केल्याचे कबूल केले. सदरबाबत संभाजीनगर पोलीस स्टेशन (जि. बीड) येथून माहिती घेतली असता संभाजीनगर पोलीस स्टेशन, जि. बीड येथे त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल असून नमूद आरोपी हा गेल्या तीन वर्षांपासून नमूद गुन्ह्यामध्ये फरार असून तो वारंवार राहण्याची ठिकाणे बदलून पोलिसांना गुंगारा देत होता. नमूद आरोपीस पुढील कारवाईसाठी संभाजीनगर पोलीस स्टेशन, जि. बीड यांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

सदरची उल्लेखनीय कामगिरी ही, पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, पोलीस सहआयुक्त डॉ. रवींद्र शिसवे, अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) भाग्यश्री नवटके, पोलीस उपआयुक्त (गुन्हे) श्रीनिवास घाडगे, सहायक पोलीस आयुक्त (गुन्हे २) लक्ष्मण बोराटे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट सहाचे पोलीस निरीक्षक गणेश माने, सहपोलीस निरीक्षक नरेंद्र पाटील, पोलीस उपनिरीक्षक सुधीर टेंगले, अंमलदार मच्छिंद्र वाळके, विठ्ठल खेडकर, कानिफनाथ कारखेले, नितीन शिंदे, नितीन मुंढे, प्रतीक लाहिगुडे, रमेश मेमाणे, बाळासाहेब सकटे, ऋषिकेश व्यवहारे, ऋषिकेश ताकवणे, सचिन पवार, ऋषिकेश टिळेकर, नितीन धाडगे, शेखर काटे, ज्योती काळे आणि सुहास तांबेकर यांनी केली आहे.

get_footer();