आवृत्ती पुणे
← Back to Homepage

खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी अर्ध्या तासात जेरबंद

maharashtra jain warta • News Slider, Police, Previous Issue • October 31, 2021

कोंढवा पोलिसांची कामगिरी : कामावरून काढून टाकण्याच्या धमकीमुळे केला हल्ला

महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क

पुणे : कामावरून काढून टाकण्याची धमकी देणाऱ्याचा लोखंडी रॉड मारून खून करणाऱ्या आरोपीस अवघ्या या तासात जेरबंद करण्यात कोंढवा पोलिसांना यश मिळाले असून, सहायक पोलीस निरीक्षक संदीप मधाळे हे गुह्याचा पुढील तपास करीत आहेत.

सोमवारी (२५ ऑक्टोबर) पहाटे साडेपाचच्या सुमारास कोंढवा पोलिसांना नियंत्रण कक्ष पुणे शहर येथून माहिती मिळाली की, इनोफ्लेक्स लॅमिनेटर्स प्रा. लि. कंपनी, सोमजी चौक, कोंढवा बु. पुणे येथे एका इसमाला मारले आहे.
सदर बातमी मिळाल्याने पोलीस उपनिरीक्षक स्वप्नील पाटील आणि स्टाफ असे सदर ठिकाणी गेले. सदर ठिकाणी गेल्यानंतर माहिती मिळाली की, कंपनीमध्ये काम करणारा इसम सुरज सुनील फाळके (वय २३, रा. लक्ष्मीनगर, कोंढवा बु., पुणे) याने कंपनीतील कामगार अमोल अंकुश खडके (वय २३, रा. लक्ष्मीनगर, कोंढवा बु., पुणे) हा काम करून कंपनीच्या पहिल्या मजल्यावर झोपलेला असताना त्याच्या डोक्यात लोखंडी रॉड मारून त्यास गंभीर जखमी करून पळून गेला आहे.
सदर आरोपीचा वरिष्ठ पोलीस निरीक्षक सरदार पाटील, पोलीस निरीक्षक (गुन्हे) जगन्नाथ जानकर, पोलीस निरीक्षक (गुन्हे) गोकुळ राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली शोध घेत असताना पोलीस उपनिरीक्षक स्वप्नील पाटील, यांना त्यांच्या बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, सदर आरोपी सुरज सुनिल फाळके हा गावी पळून जाण्याच्या तयारीत आहे. अशी खात्रीशीर माहिती मिळाल्याने फौजदार नाईक, हवालदार रमेश गरूड, पोलीस नाईक गोरखनाथ चिनके, सतीश चव्हाण, जोतीबा पवार, नीलेश देसाई, तुषार आल्हाट, पोलीस अंमलदार किशोर वळे, रासगे यांनी तात्काळ विनाविलंब सापळा रचून आरोपीस काही वेळातच लक्ष्मीनगर कोंढवा बु. पुणे येथून ताब्यात घेतले.
काही वेळाने जखमी इसम मयत झाल्याची बातमी मिळाल्याने सदरबाबत कोंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, आरोपीकडे तपास केला असता कामावरून काढून टाकण्याच्या दिलेल्या धमकीमुळे त्याच्या डोक्यात कंपनीतील मशिनचा लोखंडी रॉड मारून त्याचा खून केल्याचे सांगितले.
आरोपीस दि. मंगळवारी
(२६ ऑक्टोबर) रोजी चार वाजता अटक करून सदरच्या खुनाचा गुन्हा अवघ्या अर्धा तासात उघडकिस आणला.
सदर गुन्ह्याचा तपास पोलीस उपआयुक्त, परिमंडळ-५, पुणे शहर यांच्या मार्गदर्शनाखाली, सहायक पोलीस निरीक्षक संदीप मधाळे हे करीत आहेत.

get_footer();